Congress : काँग्रेसमध्ये अजूनही रिमोट कंट्रोल - गुलाम नबी आझाद

काँग्रेस पक्ष अजूनही रिमोट कंट्रोलच्या जोरावर चालविला जात आहे आणि अननुभवी खुशमस्कऱ्यांचा गट कारभार चालवितो आहे, असा वक्तव्य ज्येष्ठ राजकारणी तसेच माजी केंद्रीय मंत्री यांनी केले.
ghulam nabi azad and jairam ramesh
ghulam nabi azad and jairam rameshsakal
Updated on
Summary

काँग्रेस पक्ष अजूनही रिमोट कंट्रोलच्या जोरावर चालविला जात आहे आणि अननुभवी खुशमस्कऱ्यांचा गट कारभार चालवितो आहे, असा वक्तव्य ज्येष्ठ राजकारणी तसेच माजी केंद्रीय मंत्री यांनी केले.

नवी दिल्ली - काँग्रेस पक्ष अजूनही रिमोट कंट्रोलच्या जोरावर चालविला जात आहे आणि अननुभवी खुशमस्कऱ्यांचा गट कारभार चालवितो आहे, असा वक्तव्य ज्येष्ठ राजकारणी तसेच माजी केंद्रीय मंत्री यांनी केले. आझाद यांनी गेल्या वर्षी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी सप्टेंबरमध्ये लोकशाही प्रागतिक आझाद पक्षाची (डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी) स्थापना केली. त्यांचे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होत आहे. त्यात त्यांनी प्रदीर्घ तसेच वैशिष्ट्यपूर्ण राजकीय कारकिर्दीवर भाष्य केले आहे.

आझाद - अॅन ऑटोबायोग्राफीच्या प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. रिमोट कंट्रोलविषयी ते म्हणतात की, दुसऱ्याच्यावतीने अधिकार गाजविणाऱ्यांकडे पक्षाची धुरा जाऊ देण्यात आली. रिमोट कंट्रोलचे असे मॉडेल निर्माण होऊ देण्यात आले. त्यामुळे भारतासाठी जे योग्य आहे त्यासाठी लढा देण्याची इच्छाशक्ती आणि क्षमता पक्षाने गमावली.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अशी पदे भूषविलेल्या आझाद यांचा काँग्रेसशी ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्याबाबत ते म्हणाले की, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. फक्त राहुल गांधी यांच्याशी राजकीय मतभेद होते.

यानंतर त्यांनी राहुल यांच्याविषयी आणखी परखड वक्तव्य केले. ते म्हणाले की, आजघडीला राहुल यांच्याकडे कोणतेही पद नसेल, पण काँग्रेसच्या नौकेचा कप्तान कोण आहे हे प्रत्येकालाच ठाऊक आहे. निर्णय घेण्याची धुरा कुणाकडे आहे हे सर्वच जण जाणतात. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील सल्लागार यंत्रणा पूर्णपणे संपुष्टात आली. त्याऐवजी नव्या खुशमस्कऱ्यांची चलती निर्माण झाली. एक व्यक्ती म्हणून राहुल एक वाईट व्यक्ती आहे असे मला म्हणायचे नाही. व्यक्तीशः ते चांगलेच आहेत.

आरोग्य तसेच राजकीय पातळीवर मी त्यांना फक्त सदिच्छाच देऊ शकतो. आता पक्षाची नौका वल्हविण्याची जबाबदारी त्यांची आहे. ते एक उत्तम जलतरणपटू आहेत आणि लाटा उसळणारे पाणी कसे कापायचे हे त्यांना ठाऊक आहे. उद्या मल्लिकार्जुन खर्गे यांना वाटले की बंगळूरला काँग्रेसचे अधिवेशन घ्यावे तर कुणीही जाणार नाही. त्यामुळे राहुल यांनीच नौका वल्हवावी अशी माझी इच्छा आहे. आपण चांगला खलाशी आहोत की नाही हे राहुलनाच शोधून काढायचे आहे. मी आता नौकेतून उतरलो आहे. त्यामुळे मी स्वतः नदीतून वल्हवत जाणे योग्य ठरेल.

आझाद यांचे मुद्देसूद भाष्य

1) आपले मतभेदाचे मुद्दे - आपण भूतकाळात जेवढे खणू तेवढी कटुता बाहेर येईल. मला त्यातच गुंतायचे नाही, कारण आता मी त्या पक्षातून बाहेर पडलो आहे.

2) जी २३ गट - आम्ही २३ नेत्यांनी मिळून ऑगस्ट २०० मध्ये तत्कालीन पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र पाठविले. तेथेच पक्षाबरोबरील संबंधांचा अंत होण्याचा प्रारंभ झाला असावा. या पत्रामुळे सोनिया व राहुल यांनी खडबडून जागे होऊन पक्ष भक्कम करायला हवा होता. आम्ही , आम्ही सुचविल्याप्रमाणे पक्षांतर्गत निवडणूका घ्यायला हव्या होत्या, मात्र सोनिया व राहुल यांनी या पत्रावरच आक्षेप घेतला, हे म्हणजे आपल्या अधिकारांना आव्हान असल्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. जी-२३ गट भाजपधार्जिणा असल्याचा शिक्का आमच्यावर मारण्यात आला. पक्ष बळकट व्हावा म्हणून लिहिलेल्या पत्राची मला मोठी किंमत चुकवावी लागली.

3) भाजपधार्जिणे असल्याचा शिक्का - मला अजूनही प्रश्न पडतो की, जर आम्ही भाजपधार्जिणे होतो तर आम्ही पक्षसंघटना भक्कम करण्यासाठी सूचना का केल्या असत्या ? त्याऐवजी आम्ही पक्षात जे चालले होते ते तसेच चालू दिले असते आणि सध्याचे केंद्रीय नेतृत्व (भाजप) काँग्रेसमुक्त भारताचे जे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आगेकूच करीत आहे, ते सत्यात उतरू दिले असते.

काँग्रेस पक्षाकडून जोरदार प्रत्युत्तर

ज्योतिरादित्य शिंदे आणि गुलाम नबी आझाद हे दोन्ही नेते आतापर्यंत लपवून ठेवलेले आपले खरे चारित्र्य दाखवत आहेत. हे दोघे काँग्रेस यंत्रणेचे तसेच पक्षनेतृत्वाचे मोठे लाभार्थी राहिले आहेत. परंतु, आता दररोज बदलत्या काळानुसार ते दाखवून देत आहेत की या औदार्यासाठी त्यांची पात्रता नव्हती.

- जयराम रमेश, काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.