Indira Bhavan: काँग्रेसचं मुख्यालय नव्या इमारतीत होणार शिफ्ट; जाणून घ्या 'इंदिरा भवन'ची खासियत

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) आता कात टाकण्याच्या तयारीत आहे.
Congress Headquarters
Congress Headquarters
Updated on

नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) आता कात टाकण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार, दिल्ली येथील पक्षाचं मुख्यालय आता नव्या इमारतीत शिफ्ट होणार आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात हे शिफ्टिंग होणार असून काँग्रेसच्या या नव्या मुख्यालयाला इंदिरा भवन असं संबोधलं जाणार आहे. सुत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Congress party to shift its Headquarters in Delhi to the new building will be called Indira Bhawan)

कधी होणार शिफ्ट?

सध्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं (AICC) कार्यालय अर्थात काँग्रेसचं मुख्यालय हे २४, अकबर रोड या सरकारी बंगल्यात आहे. गेल्या ४० वर्षांपासून हे मुख्यालय इथं आहे. हे मुख्यालय आता नव्या जागेत कोटला रोड, दीनदयाल उपाध्याय मार्ग इथंल्या 'इंदिरा भवन' या इमारतीत शिफ्ट होणार आहे. याच ठिकाणी जवळच भाजपचं देखील मुख्यालय आहे. काँग्रेसच्या स्थापनादिनी अर्थात २८ डिसेंबर रोजी पक्षाचं मुख्यालय नव्या इमारतीत शिफ्ट होईल असं सांगितलं जातं होतं पण आता ते जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात शिफ्ट होणार आहे. (Latest Marathi News)

Congress Headquarters
New Laws: गुन्हे करुन परदेशात लपलेल्या गुन्हेगारांविरोधात आता खटला चालणार; झटपट शिक्षाही होणार

इंदिरा भवनची खासियत काय?

इंदिरा भवन ही सहा मजली हायटेक इमारत असून या इमारतीचं डिझाईन पुरस्कार विजेते आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी केलं आहे. तसेच एलअँडटी या कन्स्ट्रक्शन कंपनीनं याचं बांधकाम केलं आहे. या इमारतीला दोन प्रवेश मार्ग आहेत. एक गेट दीनदयाल उपाध्याय मार्गावर उघडतं तर दुसरं गेट कोटला रोडवर उघडतं.

पण काँग्रेसनं कोटला रोडवर उघडणाऱ्या गेटला मेन गेट म्हणून निश्चित केलं आहे. भाजप आणि काँग्रेसच्या मुख्यालयांची पत्ते हे वेगळे दिसावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. (Marathi Tajya Batmya)

Congress Headquarters
तमिळनाडूच्या मंत्र्याला हाय कोर्टाने सुनावला 3 वर्षांचा तुरुंगवास; नेमकं काय आहे प्रकरण?

सुप्रीम कोर्टाचा आदेश

यापूर्वी २४ अकबर रोडवरील मुख्यालयासह काँग्रेसकडून आपल्या विविध विंगची कार्यालय राजधानी दिल्लीत सरकारी इमारतींमध्ये चालवली जात होती. यामध्ये सेवादल २६ अकबर रोड, युथ काँग्रेस आणि NSUI ५ रायसिना रोडवर चालवली जात आहेत. (Latest Marathi News)

दरम्यान, केंद्रीय घरे आणि नागरी कामकाज मंत्रालयानं काँग्रेसला हे सरकारी बंगले खाली करण्यासाठी नोटीस पाठवली होती. त्यामुळं काँग्रेसला नव्या मुख्यालयाची उभारणी करणं भाग पडलं. यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं आदेश दिले होते की, सर्व राजकीय पक्षांनी सरकारी जागेतील आपली कार्यालये रिकामी करावीत.

Congress Headquarters
Datta Jayanti 2023 : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा! दत्तगुरूंचे सोळा अवतार कोणते?

भाजपचं कार्यालय नव्या मुख्यालयात

दरम्यान, भाजपनं देखील गेल्या ३५ वर्षांपासून अशोका रोडवर असलेलं पक्षाचं मुख्यालय सन २०१८ मध्ये नव्या इमारतीत हलवलं. त्यानुसार भाजपचं मुख्यालय आता दीनदयाल उपाध्याय मार्गवर स्थित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.