PM मोदींनी लक्ष घातलेल्या 'या' राज्यात भाजपला बसणार मोठा धक्का; काँग्रेसला 114 तर BJP ला मिळणार 'इतक्या' जागा

काँग्रेसला एससी/एसटी आणि अल्पसंख्याक समुदायांचा सर्वाधिक पाठिंबा मिळेल, असं सर्वेक्षणात दिसून आलं आहे.
Karnataka Assembly Election
Karnataka Assembly Electionesakal
Updated on
Summary

बी. एस. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास सांगितल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे.

बंगळूर : राज्याबाहेरील एका स्वतंत्र एजन्सीनं केलेल्या सर्वेक्षणात विरोधी पक्ष काँग्रेसला १०८ ते ११४, भाजपला ६५ ते ७५ आणि धजदला २४-३४ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

२० नोव्हेंबर ते १५ जानेवारीपर्यंत कर्नाटकातील आयपीएसएस टीमच्या (Karnataka IPSS Team) सहकार्यानं हैदराबादच्या एसएएस ग्रुपनं (Hyderabad SAS Group) केलेल्या सर्वेक्षणात असं नमूद केलंय की, काँग्रेसला (Congress) ३८.१४ टक्क्यांवरून सुमारे ४० टक्क्यांपर्यंत (अधिक १.८६ टक्के) मते मिळू शकतात, तर भाजपला (BJP) ३६.३५ टक्क्यांवरून ३४ टक्क्यांपर्यंत (उणे २.३५ टक्के) घसरण होईल. धजदलाही १८.३ टक्क्यांवरून १७ टक्क्यांपर्यंत १.३ टक्क्यांनी घसरण होऊ शकते, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

अपक्षांसह इतरांना सहा टक्के मते मिळू शकतात. लहान पक्ष आणि अपक्षांना सात जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. बंगळूर शहरात काँग्रेसचे १३-१४ आमदार तर भाजपचे ९-१० आमदार निवडून येऊ शकतील. जुन्या म्हैसूर प्रदेशात, जिथे भाजप खूप प्रयत्न करत आहे, तेथे फक्त १०-१४ जागा जिंकू शकतो. काँग्रेस २४ ते २५ जागा मिळवू शकते. तर धजदला २१ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Karnataka Assembly Election
चमत्कारानं जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग आम्हीही नमस्कार करू; शंकराचार्यांचं थेट चॅलेंज

उत्तर कर्नाटकात कॉंग्रेसचा वरचष्मा

कित्तूर कर्नाटक भागात (उत्तर कर्नाटक) काँग्रेसला २७ ते २८ जागा आणि भाजपला १४ ते १६ जागा मिळण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात भाजप १२ ते १३ जागा मिळतील. तर काँग्रेसला फक्त सात ते आठ जागा मिळू शकतात. हैदराबाद-कर्नाटकमध्ये जिथे भाजपचे माजी नेते जनार्दन रेड्डी भाजपला धक्का देऊ शकतात. तेथे भाजपला १२ ते १४ जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळणे शक्य आहे.

Karnataka Assembly Election
Devendra Fadnavis : सीमावाद सुरु असतानाच फडणवीसांची कन्नडमधून भाषणाला सुरुवात; म्हणाले, मला कन्नड भाषा..

मध्य कर्नाटकात काँग्रेसला १६ ते १७ जागा भाजपला केवळ ८ ते ९ जागा मिळतील. बी. एस. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास सांगितल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसला मागास, एससी/एसटी आणि अल्पसंख्याक समुदायांचा सर्वाधिक पाठिंबा मिळेल, असे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. वक्कलिग कोणाला पाठिंबा देतील, या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की ५० टक्के समुदाय धजद, ३८ टक्के काँग्रेस आणि १० टक्के भाजपला पाठिंबा देऊ शकतात.

Karnataka Assembly Election
Moreshwar Temurde : शरद पवारांचे निकटवर्तीय ज्येष्ठ नेत्याचं निधन; पार्थिवाबाबत कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय!

रेड्डी दणका देणार?

जनार्दन रेड्डी यांचा कल्याण राज्य प्रगती पक्ष कोप्पळ, गंगावती, बळ्ळारी, कोलार, दावणगेरे आणि रायचूरमध्ये निर्णायक ठरु शकते. हा नवीन पक्ष काही जागा जिंकू शकतो, असे भाकीत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.