गुजरात काँग्रेसने या वर्षाच्या उत्तरार्धात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सोशल मीडिया (Social media) टीमची पुनर्रचना केली आहे. मतदारांमध्ये पक्षाच्या कार्याची माहिती पोहोचवण्यासाठी आणि खोट्या बातम्यांचा सामना करण्यासाठी सुमारे दोनशे कार्यकर्त्यांना सामील केले आहे. पक्षाच्या प्रवक्त्याने रविवारी (ता. २७) ही माहिती दिली.
पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नव्या भरतीमध्ये जिल्हा आणि मेट्रो स्तरावरील ४१ अध्यक्ष, १५ उपाध्यक्ष, ३० सरचिटणीस, ४४ सचिव आणि ६० कार्यकारी समिती सदस्यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या अगोदर पक्षाने सोशल मीडियावरील (Social media) उपस्थिती हाताळण्यासाठी नवीन टीम जाहीर केली आहे. अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या जात आहेत. आगामी काळात सोशल मीडियावर मेगा मीटिंग आयोजित करण्याचा पक्षाचा विचार आहे, असे गुजरात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते मनीष दोशी यांनी सांगितले.
या टीममध्ये समर्पित कार्यकर्त्यांचा समावेश आहे. इतर राजकीय पक्षांप्रमाणे पगारी सेना नाही. सोशल मीडियावर (Social media) सक्रिय असलेल्या आमच्या इतर कार्यकर्त्यांना प्रेरणा देतील आणि त्यांच्यासोबत नेटवर्क स्थापित करतील. जेणेकरून ते आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाबद्दल खोट्या बातम्या आणि चुकीच्या माहितीचा सामना करून प्रभावी भूमिका बजावू शकतील, असेही मनीष दोशी म्हणाले.
१९९५ पासून भाजपची सत्ता
काँग्रेस (Congress) कार्यकर्ते बूथ-स्तरीय व्हॉट्सॲप ग्रुपसह सर्व प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social media) सामील होतील. भाजपने पसरवलेले खोटे उघड करणे आणि सत्य समोर आणणे ही त्यांची सर्वांत मोठी भूमिका असेल. असेही दोशी म्हणाले. गुजरातमध्ये (Gujrat) १९९५ पासून भाजपची सत्ता आहे, हे विशेष...
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.