Congress : मल्लिकार्जुन खर्गे होणार काँग्रेसचे नवे अध्यक्ष? G-23 नेत्यांचा खर्गेंना पाठिंबा!

काँग्रेस हायकमांडच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या गटातही अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून फूट पडलीय.
Mallikarjun Kharge Shashi Tharoor
Mallikarjun Kharge Shashi Tharooresakal
Updated on
Summary

काँग्रेस हायकमांडच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या गटातही अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून फूट पडलीय.

Congress President Election 2022 : काँग्रेस हायकमांडच्या (Congress High Command) विरोधात जोरदार आवाज उठवणाऱ्या गटातही अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून फूट पडलीय. G-23 गटाचे मनीष तिवारी, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि भूपिंदर हुडा यांनी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पाठिंबा दिलाय.

G-23 गटातील या नेत्यांनी शुक्रवारी 30 सप्टेंबर रोजी खर्गे यांच्या समर्थनार्थ काँग्रेस अध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी केलीय. G-23 गटाच्या नेत्यांची गुरुवारी 29 सप्टेंबर रोजी उशिरा बैठक झाली. आनंद शर्मा यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला मनीष तिवारी, पृथ्वीराज चव्हाण, भूपेंद्र हुडा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्यानंतर खर्गे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Mallikarjun Kharge Shashi Tharoor
Congress : अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट? 'या' दोन दिग्गज नेत्यांत 'कांटे की टक्कर'

शुक्रवारी काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या नामांकनादरम्यान 30 काँग्रेस नेत्यांनी खर्गे यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला. मात्र, खर्गे यांच्या आधी अशोक गेहलोत, शशी थरूर, दिग्विजय सिंह, कमलनाथ आणि मनीष तिवारी यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. पण, आता शशी थरूर विरुद्ध मल्लिकार्जुन खर्गे यांच्यातच खरी लढाई रंगणार आहे.

Mallikarjun Kharge Shashi Tharoor
NCP : सुप्रिया सुळेंनी भाजप अध्यक्षांना स्पष्टचं सुनावलं; म्हणाल्या, जे-जे बारामती बघायला येतील त्यांचं..

G-23 गटानं 2020 मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात G-23 गटानं काँग्रेसमध्ये आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली होती. मनीष तिवारी, आनंद शर्मा तसेच थरूर हेही या गटात होते. त्यामुळं आता मनीष तिवारी आणि आनंद शर्मा यांनी त्यांच्या गटातील सदस्यांऐवजी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवलाय. तिवारी आणि शर्मा खर्गे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) कार्यालयात पोहोचले होते.

Mallikarjun Kharge Shashi Tharoor
NIA Report : RSS नेत्यांच्या जीवाला PFI कडून धोका; मोदी सरकारनं वाढवली सुरक्षा

'शशी थरूर यांनी पाठिंबा मागितला नाही'

The Print च्या वृत्तानुसार G-23 गटाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की, G-23 गटाची मागणी पूर्ण झालीय. मागणी पूर्ण व्हायला थोडा वेळ लागला तरी आमच्या दोन्ही मागण्या पूर्ण झाल्या आहेत. शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. परंतु, G-23 गटाच्या नेत्यांचा त्यांनी पाठिंबा मागितला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()