शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत; राहुल गांधींना देणार थेट चॅलेंज?

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच काँग्रेस अध्यक्ष कोण होणार, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय.
Congress President Election 2022
Congress President Election 2022esakal
Updated on
Summary

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच काँग्रेस अध्यक्ष कोण होणार, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय.

नवी दिल्ली : काँग्रेसनं नवा अध्यक्ष निवडण्यासंबंधी (Congress President Election) विस्तृत कार्यक्रमाची रविवारी घोषणा केली. त्यानुसार 24 सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तर, एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) ऑनलाइन बैठकीत केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडून सादर झालेल्या निवडणूक कार्यक्रमास मंजुरी देण्यात आलीय.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच काँग्रेस अध्यक्ष कोण होणार, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत त्यांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाहीय. सूत्रांनी सांगितलं की, थरूर यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून ते लवकरच यावर निर्णय घेऊ शकतात.

शशी थरूर या निवडणुकीत सहभागी होणार की नाही यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिलाय. थरूर यांनी मल्याळम दैनिक मातृभूमीमध्ये एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांचं आवाहन केलंय. या लेखात त्यांनी पुढं म्हटलंय, 'पक्षानं काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) डझनभर जागांसाठीही निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत.'

Congress President Election 2022
Ramdas Athawale : काँग्रेस अध्यक्ष कोणाला करायचं? रामदास आठवले स्पष्टचं बोलले

2020 मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना संघटनात्मक सुधारणांची मागणी करणारं पत्र लिहिलेल्या 23 नेत्यांच्या गटाचा भाग असलेले थरूर म्हणाले, एआयसीसी आणि पीसीसी प्रतिनिधींकडून या महत्त्वाच्या पदांवर पक्षाचं नेतृत्व कोण करणार हे पक्षाच्या सदस्यांना ठरवू द्यावं, असं ते म्हणाले. नवीन अध्यक्ष निवडणं ही काँग्रेसला नितांत गरज असून पुनरुज्जीवनाच्या दिशेनं केवळ ही एक सुरुवात आहे. निवडणुकीसाठी अनेक उमेदवार पुढं येतील, अशी माझी अपेक्षा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Congress President Election 2022
'जे 40 वर्षे एकत्र होते तेही पक्ष सोडताहेत, काँग्रेस आता भावा-बहिणीचा पक्ष झालाय'

पक्षाला पूर्णपणे पुनरुज्जीवित करणं आवश्यक असलं तरी, नेतृत्वाची जागा ताबडतोब भरणं आवश्यक आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी (Rahul Gandhi) नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.