Congress : जुनी काँग्रेस हवी असेल तर खर्गेंना मत द्या, नव्या बदलासाठी मी उभा आहेच - शशी थरूर

काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होत आहे.
Congress President Election 2022
Congress President Election 2022esakal
Updated on
Summary

काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होत आहे.

Congress President Election 2022 : काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यात थेट लढत होत आहे. यादरम्यान, अध्यक्षपदाबाबत शशी थरूर यांनी मोठं वक्तव्य केलंय. काँग्रेसला जुनं हवं असेल तर खर्गेंना मत द्या आणि बदल हवा असेल तर मी उभा आहे, असं थरूर म्हणाले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी माझी ही लढाई नाही, असंही थरूर यांनी स्पष्ट केलं.

शशी थरूर म्हणाले, 'गांधी परिवार (Gandhi Family) आणि काँग्रेसचा डीएनए एकच आहे. 17 ऑक्टोबरला होणाऱ्या पक्षाच्या निवडणुकीनंतर जो कोणी काँग्रेसचा अध्यक्ष होईल, तो गांधी घराण्याला अलविदा म्हणण्यासारखा मूर्खपणाचा निर्णय घेऊ शकत नाही. ते आमच्यासाठी खूप मोठी संपत्ती आहेत. ही लढाई नाहीय. दोघांपैकी कोणाची निवड करणं हे काँग्रेस कार्यकर्त्यांवर सोडलं आहे.'

Congress President Election 2022
Cheetah Project : नामिबियातून आलेल्या 'आशा'नं दिली गुडन्यूज; भारतात चित्त्यांची संख्या वाढणार

पक्षाच्या कामावर समाधानी असाल, तर खर्गे साहेबांना मतदान करा. पण, तुम्हाला बदल हवा असेल आणि पक्ष वेगळ्या पद्धतीनं चालवायचा असेल तर मला निवडा. ही वैचारिक लढाई नाहीय. काँग्रेस पक्षाच्या संदेशात कोणताही बदल होणार नाही. जी अंतर्गत लोकशाही आम्ही दाखवत आहोत, ती इतर कोणत्याही पक्षात नाही, असंही थरूर यांनी स्पष्ट केलं.

Congress President Election 2022
Indonesia Football Match : इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा हिंसाचार; 127 हून अधिक लोकांचा मृत्यू

काँग्रेस नेते पुढे म्हणाले, मी एक लेख लिहिला होता, ज्यात निवडणूक पक्षासाठी चांगली असल्याचं म्हटलं होतं आणि त्याची कारणंही मी नमूद केली होती. त्यानंतर अनेकांनी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मला निवडणूक लढवण्यास सांगितलं होतं. माझी एवढीच इच्छा आहे की, पक्ष मजबूत असावा आणि मी पक्षातील परिवर्तनाचा आवाज बनून माझा वेगळा चेहरा लोकांना दाखवावा, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.