Congress : शशी थरूरांनी जाहीरनामा केला प्रसिद्ध; म्हणाले, भाजपला सामोरं जाण्यासाठी काँग्रेसनं..

'लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत.'
Congress President Election Shashi Tharoor
Congress President Election Shashi Tharooresakal
Updated on
Summary

'लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत.'

Congress President Election : काँग्रेस पक्षाला अडीच दशकांनंतर गांधी घराण्याव्यतिरिक्त नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस अध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर (Shashi Tharoor) हे मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.

गुरुवारी केरळमध्ये खासदार शशी थरूर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपला सामोरं जाण्यासाठी काँग्रेसनं पक्षाचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे, असं सांगितलं. त्यानंतर तामिळनाडूतील काँग्रेसचे राज्य मुख्यालय सत्यमूर्ती भवन इथं पत्रकारांशी बोलताना थरूर म्हणाले, "पक्षाचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे, कार्यकर्त्यांना सशक्त केलं पाहिजे आणि लोकांशी संपर्क वाढवला पाहिजे. मला विश्वास आहे की, यामुळं काँग्रेसला मदतच होईल. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपशी सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Congress President Election Shashi Tharoor
PHOTO : जनावरांची 'वंदे भारत एक्सप्रेस'ला जोराची धडक; अपघातात एक्स्प्रेसचं मोठ नुकसान

पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल आपल्याला पूर्ण आदर असल्याचं स्पष्ट करून थरूर म्हणाले, ही निवडणूक भाजपशी लढण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित मैत्रीपूर्ण स्पर्धा आहे. तिचा विचारधारेशी काहीही संबंध नाही. कारण, दोघंही सारखेच आहोत. आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करताना थरूर म्हणाले, "आपल्या पक्षाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची आपल्याला गरज आहे. आपल्याला तरुणांना पक्षात सामावून घेऊन त्यांना खरी ताकद देण्याची गरज आहे. त्याच बरोबर कष्टाळू आणि जुन्या कार्यकर्त्यांना अधिक सन्मान देण्याची गरज आहे."

Congress President Election Shashi Tharoor
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अडकणार ED च्या कचाट्यात; डीकेंना 7 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावणं!

जाहीरनाम्यात ते म्हणाले, सत्तेचं/अधिकारांचं विकेंद्रीकरण, बूथ स्तरावर पक्ष मजबूत करणं, पक्षाचे राज्य प्रभारी म्हणून काम करणाऱ्या सरचिटणीसांचा देश उभारणीशी संबंधित कामांसाठी वापर करणं आणि प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ त्यांच्यापुरता मर्यादित करणं, असं त्यांनी नमूद केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.