Mallikarjun Kharge : "माझा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांकडे आहे पण नड्डांचं काय?" ; खरगेंचा मोदींवर पलटवार!

Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge
Updated on

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच पक्ष तिथं शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आतापासूनच आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.

आज (सोमवार) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बेळगावी येथे एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'रिमोट कंट्रोल' वक्तव्यावर जोरदार प्रहार केला. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा रिमोट कंट्रोल कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला.

यादरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार पक्षाचे नेते राहुल गांधींना त्रास देत असल्याचा आरोपही केला. ते म्हणाले की, सत्य बोलल्यामुळे त्यांचा छळ केला जात आहे, मात्र अशा गोष्टींना मी घाबरत नाही आणि प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे.

Mallikarjun Kharge
Old Pension Scheme : 'हा तर विश्वासघात!' कर्मचारी संतापले, संप सुरुच राहणार

कर्नाटकमध्ये 'युवा क्रांती संदेश' या युवा संमेलनाला संबोधित करताना  मल्लिकार्जुन खरगे  म्हणाले, "मोदी बेळगावी आले आणि म्हणाले - खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत, परंतु रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे आहे. ठीक आहे, माझा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांकडे आहे, पण नड्डा यांचा रिमोट कंट्रोल कुठे आहे?. नड्डा कोणाच्या रिमोटवरून बोलतात? 

Mallikarjun Kharge
Vasant More : मनसे नेते वसंत मोरेंचे थेट एकनाथ शिंदेंना पत्र! केली 'ही' मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()