झारखंडमधील खनिजसंपत्तीची लूट करण्यासाठी भाजपला राज्यात सत्ता हवी आहे, त्यांना राज्यातील जनतेच्या हिताशी काही घेणेदेणे नाही, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी केला. येथील मंडू येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. झारखंडमधील एकूण उमेदवारांपेक्षा येथील भाजप नेत्यांची संख्या जास्त आहे, कारण सर्वांना या येथील आदिवासी मुख्यमंत्र्याला सत्तेवरून खाली खेचायचे आहे, असा आरोप खर्गे यांनी केला.