'सोनिया गांधी इतर कोणत्याही भारतीय महिलेपेक्षा कमी नाहीत.'
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणाची (National Herald Case) अंमलबजावणी संचालनालय (ED) पुन्हा चौकशी करत आहे. या प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना समन्स बजावण्यात आलंय. यापूर्वी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी करण्यात आलीय.
तर, दुसरीकडं काँग्रेसनं पुन्हा एकदा देशभरात ताकद दाखविण्याची घोषणा केलीय. त्याअंतर्गत आज दिल्ली, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) अंमलबजावणी संचालनालयात हजर झाल्याच्या विरोधात काँग्रेस नेत्यांनी रस्त्यावरून संसदेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवलंय. नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) सोनिया गांधी यांच्या चौकशीच्या विरोधात देशभरात निदर्शनं सुरू आहेत.
तत्पूर्वी, एआयसीसी मुख्यालयात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या वक्तव्यात खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. गांधी घराणं आणि काँग्रेस समजायला या दोन्ही भाजप नेत्यांना अनेक वेळा पुनर्जन्म घ्यावा लागेल, असं त्यांनी म्हटलंय.
मीडियाशी बोलताना काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते पवन खेरा पुढं म्हणाले, काँग्रेस नेते पंतप्रधान मोदींना 'राजधर्म'ची आठवण करून देत असल्यानं केंद्रीय तपास यंत्रणा गांधी कुटुंबाला बोलावत असल्याचा आरोप खेरांनी केलाय. केंद्रातील भाजप सरकारला आव्हान देताना खेरा म्हणाले, समन्स जारी करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावापुढं त्यांचे नेते झुकणार नाहीत. दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्याबद्दल पंतप्रधान मोदींवर टीका केलीय. गेहलोत यांनी आपल्या भाषणात म्हटलंय, 'सोनिया गांधी इतर कोणत्याही भारतीय महिलेपेक्षा कमी नाहीत. त्यांनी आपली सर्व संस्कृती आणि परंपरा स्वीकारली आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात कोणताही पुरावा नसताना त्यांना समन्स का पाठवत आहे, याचा खुलासा करण्याची मागणीही गेहलोत यांनी पत्रकार परिषदेतून केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.