आपले पर्यटक पंतप्रधान, प्रियांका गांधींची मोदींवर टीका

PM Modi-Priyanka Gandhi
PM Modi-Priyanka GandhiTeam esakal
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसतर्फे आज जयपूरमध्ये महागाईच्याविरोधात (Congress Rally Against Inflation Jaipur) मोर्चा काढण्यात आला. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Congress Leader Priyanka Gandhi) देखील सहभागी झाले होते. यावेळी प्रियांकांनी थेट मोदींवर (PM Modi) निशाणा साधला. आपले पर्यटक पंतप्रधान असा मोदींचा उल्लेख केला. ते विदेशात फिरण्यात व्यस्त असतात. पण १० किलोमीटरवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना भेटायला गेले नाहीत, अशी टीका प्रियांका गांधींनी केली आहे.

PM Modi-Priyanka Gandhi
७० वर्षांचं रडगाणं थांबवा, ७ वर्षात तुम्ही काय केलंत - प्रियांका गांधी

मोदी सरकारने उत्तर प्रदेशात करोडो रुपये फक्त जाहिरातींवर खर्च केले. मात्र, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एकही रुपया खर्च केला नाही. केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या भल्याची चिंता नाही. हे सरकार फक्त काही उद्योजकांसाठी काम करत आहे. काँग्रेसने ७० वर्षात उभारलेला देश या सरकारने उद्योजकांना विकला आहे. तुम्ही सात वर्षांत काय केलंय ते सांगा? असा सवालही त्यांनी मोदी सरकारला विचारला.

केंद्र सरकार सत्य बोलत नाही. फक्त जनतेला मूळ मुद्द्यापासून दूर नेण्याचं काम करतेय. हे सरकार फक्त समाजाला विभागणाऱ्या गोष्टींवर, धर्मावर चर्चा करतेय. पण, विकासाच्या गोष्टींबाबत भाष्य करत नाही, असा आरोपही प्रियांकांनी केला. महागाईमुळे जीवन जगणं कठीण झालं आहे. त्यामुळेच तुम्ही आजच्या मोर्चामध्ये सहभागी झाला आहात, असं आंदोलकांना संबोधित करताना त्या म्हणाल्या. देशात इतकी महागाई का आहे? हे विचारण्याची जबाबदारी तुमची आहे. तुमचा विकास करण्याची मोठी जबाबदारी सरकारची आहे. मग एक मजबूत भविष्य मागण्याची जबाबदारी तुमची आहे, असंही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.