Rahul Gandhi: राहुल गांधींची वायनाडमध्ये 'तात्काळ आवश्यकता'; 'न्याय यात्रा' सोडून अचानक झाले रवाना; काय आहे कारण?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची पूर्व-पश्चिम अशी भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. सध्या त्यांची यात्रा उत्तर प्रदेशातून जात आहे. (Rahul Gandhi abruptly halts bharat jodo nyay Yatra)
Rahul Gandhi
Rahul Gandhi
Updated on

नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची पूर्व-पश्चिम अशी भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. सध्या त्यांची यात्रा उत्तर प्रदेशातून जात आहे. शनिवारी त्यांची यात्रा वाराणसीतून भेदोहीकडे जाणार होती. पण, अचानक राहुल गांधी आपला लोकसभा मतदारसंघ वायनाडकडे रवाना झाले आहेत. यात्रा अचानक सोडण्यामागे कारण काय? असा प्रश्न लोकांना पडला आहे. (congress Rahul Gandhi abruptly halts bharat jodo nyay Yatra in Varanasi urgently required in Wayanad Here what happened)

काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी राहुल गांधींच्या वायनाड दौऱ्याची माहिती दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. राहुल गांधी यांची वायनाड येथे गरज आहे. शुक्रवारी रात्री ते वायनाडला रवाना झाले आहेत. रविवारी दुपारी तीन वाजता प्रयागराज येथून यात्रेला पुन्हा सुरुवात होईल, अशी माहिती त्यांनी दिलीये.

Rahul Gandhi
Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा लवकर संपवणार; काय घडलंय नेमकं?

यात्रा स्थगित करण्याचे कारण काय?

शुक्रवारी सकाळी एका जंगली हत्तीच्या हल्ल्यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्या व्यक्तीला कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, पण त्यातच त्याचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती वन विभागाचा इको-टूरिझम गाईड होता. तो प्रसिद्ध पर्यटन ठिकाण कुरुवा द्वीवर येथे काम करत होता.

हत्तीच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्याने विरोधी पक्ष यूडीएफ आणि भाजप आक्रमक झाली आहे. प्राण्यांच्या सामान्य माणसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. याच संदर्भात राहुल गांधी वायनाड येथे जात असल्याचं समजतंय. गेल्या १७ दिवसांमध्ये प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

Rahul Gandhi
Sonia Gandhi : रायबरेलीच्या मतदारानों, माझ्या कुटुंबालाही सांभाळा; सोनिया गांधी यांचे भावनिक पत्र

राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. सध्या त्यांची यात्रा उत्तर प्रदेशात असून यानंतर ती राजस्थानमध्ये प्रवेश करेल. १४ जानेवारी २०२४ मध्ये त्यांनी मणिपूरमधून यात्रेला सुरुवात केली होती. ही यात्रा १५ राज्यामधून जाणार असून एकूण ६७०० किलीमीटरचे हे अंतर असेल. मुंबईमध्ये ही यात्रा संपेल.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.