Rahul Gandhi In USA: अमेरिकेत जाऊन राहुल गांधींनी घेतली भारतविरोधी नेत्याची भेट, फोटो व्हायरल; नव्या वादाला फुटलं तोंड

Rahul Gandhi America Tour ilhan omar meet: राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन संसदेच्या प्रतिनिधींची भेट घेटली. यावेळी त्यांनी एक फोटो काढला. या फोटोमध्ये ते भारत विरोधी इल्हान उमरसोबत दिसून येत आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi
Updated on

नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे तीन दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हा दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यांच्या काही वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यातच त्यांच्या एका फोटोमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजप नेत्यांनी यावर आक्षेप घेऊन टीका करण्यास सुरुवात केली आहे.

राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन संसदेच्या प्रतिनिधींची भेट घेटली. यावेळी त्यांनी एक फोटो काढला. या फोटोमध्ये ते भारत विरोधी इल्हान उमरसोबत दिसून येत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमुळे भाजपला राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी एक चांगला मुद्दा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.