नवी दिल्ली : West Bengal Assembly Election 2021 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी हळूहळू वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत सध्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपचीच चर्चा सुरु आहे. मात्र, या निवडणुकीत आता काँग्रेसही जोर लावणार आहे. कारण, काँग्रेसनं नुकतीच ३० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh), खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचा या यादीत समावेश आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ही स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. या यादीमध्ये सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी-वढेरा, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गहलोत, कॅप्टन अमरिंदर सिंग, भूपेश बघेल, कमलनाथ, अधिर रंजन चौधरी, बी. के. हरिप्रसाद, सलमान खुर्शीद, सचिन पायलट, रणदीपसिंह सुर्जेवाला, जितीन प्रसाद, आर. पी. एन. सिंह, नवज्योतसिंग सिद्धू, अब्दुल मन्नान, प्रदीप भट्टाचार्य, दीपा दासमुन्शी, ए. एच. खान चौधरी, अभिजीत मुखर्जी, दिपेंद्र हुडा, अखिलेश प्रसाद सिंह, रामेश्वर ओराओन, अलमगिर अलम, मोहम्मद अझरुद्दीन, जयवीर शेरगील, पवन खेरा, बी. पी. सिंह या तीस जणांचा या यादीत समावेश आहे.
दरम्यान, या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही काँग्रेस नेत्याचं नाव नसल्याने त्यावरुन सोशल मीडियात टीकाटिपण्णी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा काँग्रेस हायकमांडला विसर पडला काय? असा सवालही नेटकऱ्यांनी विचारला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.