नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (१७ सप्टेंबर २०२२) मध्य प्रदेशच्या राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांना सोडण्यात आले. याबाबत काँग्रेसने शुक्रवारी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, मनमोहन सिंग यांनी 2008-09 मध्ये 'प्रोजेक्ट चित्ता'च्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. (project cheetah news in Marathi)
1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून तत्कालीन वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांच्या फोटोसह ट्विट करण्यात आले होते, 'प्रोजेक्ट चित्ता' प्रस्ताव २००८-०९ मध्ये तयार करण्यात आला होता. मनमोहन सिंग यांच्या सरकारने त्यास मान्यता दिली होती.
ट्विटमध्ये पुढे लिहिले की, 'एप्रिल 2010 मध्ये तत्कालीन वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश आफ्रिकेतील चित्ता आउटरीच सेंटरमध्ये गेले होते. मात्र 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने या प्रकल्पावर बंदी घातली होती. मात्र 2020 मध्ये ही बंदी उठवण्यात आली.
जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत ट्विटमध्ये लिहिले की, 'पंतप्रधान क्वचितच प्रशासनातील सातत्याचा स्वीकार करतात. चित्ता प्रकल्पासाठी 25 एप्रिल 2010 रोजी मी केपटाऊनला भेट दिली त्याचा साधा उल्लेखही होऊ शकला नाही, त्याचे हे उदाहरण आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय प्रश्न दडपण्यासाठी आणि 'भारत जोडो यात्रे'वरून लक्ष हटवण्यासाठी इव्हेंट केल्याचा दावाही रमेश यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.