काँग्रेसला संसदेत मोठा झटका; दोन महत्त्वाच्या समित्यांची जबाबदारी काढून घेण्याची शक्यता!

मोदी सरकार काँग्रेसला आणखी अडचणीत आणण्याची शक्यता आहे.
Modi Government vs Congress
Modi Government vs Congress esakal
Updated on
Summary

मोदी सरकार काँग्रेसला आणखी अडचणीत आणण्याची शक्यता आहे.

दिल्ली : मोदी सरकार (Modi Government) काँग्रेसला (Congress) आणखी अडचणीत आणण्याची शक्यता आहे. कारण, सरकारच्या 'त्या' निर्णयामुळं पक्षाची संसदेतील (Parliament) ताकद कमी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाकडून दोन महत्त्वाच्या संसदीय समित्या काढून घेतल्या जाऊ शकतात. यामध्ये गृह आणि आयटी समितीचा समावेश आहे. या दोन्ही संसदीय समित्यांवर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची मजबूत पकड आहे.

अशा परिस्थितीत समित्या हातातून जाण्याच्या भीतीनं लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी सभापती ओम बिर्ला (Om Birla) यांना पत्र लिहून सरकारच्या या निर्णयावर आक्षेप नोंदवलाय. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय समितीचं अध्यक्षपद काँग्रेसकडून काढून घेण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.

Modi Government vs Congress
Congress : मनीष तिवारी, पृथ्वीराज चव्हाण पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची दाट शक्यता!

चौधरी यांनी पत्रात लिहिलंय, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद काँग्रेसकडून काढून घेण्याचा निर्णय आक्षेपार्ह आहे, असं म्हटलंय. विभागीय स्थायी समिती यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये चर्चा आणि संवादाच्या तत्त्वांचा आदर केला पाहिजे आणि पक्षभावनेच्या वरती सहकार्याला प्रोत्साहन दिलं पाहिजं, हे सरकारनं समजून घ्यायला हवं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याआधी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही एक पत्र लिहून गृहखात्याशी संबंधित समिती काँग्रेसकडून हिसकावून घेतली जात असल्याचा आरोप केला होता.

Modi Government vs Congress
Delhi : CM शिंदेंनी रात्री उशिरा घेतली अमित शाहांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()