कॉंग्रेसचे खासदार व संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान स्थायी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांचे संसद सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी भाजपने केली आहे
नवी दिल्ली- कॉंग्रेसचे खासदार व संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान स्थायी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांचे संसद सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी भाजपने केली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा उल्लेख भारतीय व्हेरियंट असा करून थरूर यांनी देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचविल्याचा भाजपचा आरोप आहे. याबाबत खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून ही मागणी केली. (congress shashi Tharoor cancel the MP bjp nisikant dube)
थरूर हे अनेकदा वादग्रस्त ट्विट केल्याने भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांच्याबाबतीत यापूर्वी माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या बाबतीत आक्षेपार्ह ट्विट करून ते मागे घेतल्याचा प्रकार ताजा आहे. ताज्या टूलकिट प्रकरणातील थरूर यांच्या भूमिकेने भाजप खासदारांचा पुन्हा भडका उडाला असून भारतीय संसद व सरकारची प्रतिमा मलिन केली. त्यामुळे थरूर यांचे संसद सदस्यत्वच माफ करा, अशी मागणी पुढे आली आहे. राज्यघटनेच्या १० व्या परिशिष्ट नुसार थरूर यांनी जे प्रकार केले ते पहाता त्यांचे सदस्यत्व तत्काळ रद्द करण्याचा अधिकार सभापतींनी बजावावा अशी विनंती दुबे यांनी पत्रात केली आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ला भारतीय कोरोना म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांमध्ये थरूर हेही आहेत. दुबे यांनी म्हटले आहे, की जेव्हा जागतिक आरोग्य संघटनाही नव्या व्हेरियंटला बी.१.१६७ असे म्हणते तेव्हा एक भारतीय खासदारच देशाबद्दल अपमानास्पद ठरणारा व तद्दन अवैज्ञानिक शब्द वापरून भारताचा अपमान करण्यास कसा धजावतो हे समजशक्तीच्या पलीकडे आह
सर्व समाज माध्यमांवर भारतीय व्हेरियंट हा शब्द हटविण्याचे निर्देश भारत सरकार व आरोग्य मंत्रालयाने देऊनही थरूर यांनी जाणीवपूर्वक तो शब्द वापरला व देशाचा अपमान केला, असं खासदार निशिकांत दुबे म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.