सोनिया गांधींच्या चौकशीची धुरा ईडीच्या महिला अधिकाऱ्याकडे, जाणून घ्या डिटेल्स

congress sonia gandhi interrogation by ED monica sharma in three round priyanka gandhi will present
congress sonia gandhi interrogation by ED monica sharma in three round priyanka gandhi will present
Updated on

Sonia Gandhi Introgation: नॅशनल हेराल्डप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी यांची चौकशी केली जात आहे. यादरम्यान आज पुन्हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी झाली. या चौकशी दरम्यान सोनिया यांच्या कन्या आणि कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत औषधे घेऊन त्यांच्यासोबत ईडी कार्यालयातील हजर होत्या. (congress sonia gandhi interrogation by ED monica sharma in three round priyanka gandhi will present)

महिला आधिकाऱ्याकडून सोनिया गांधींची चौकशी

सोनिया गांधी यांच्या चौकशीची कमानही देखील महिला अधिकारी मोनिका शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्या ईडीमध्ये अतिरिक्त संचालक पदावर कार्यरत आहेत.ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की 75 वर्षीय सोनिया गांधी यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर कार्यालयात रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळेच प्रियांका गांधी यांनाही कार्यालयात राहण्याची परवानगी देण्यात आली असून सोनिया गांधी त्यांना औषधे आणि इतर गरजांसाठी भेटू शकतात. एवढेच नाही तर त्यांना विश्रांतीची गरज भासल्यास त्यासाठी त्यांना संधीही दिली जाईल.

चौकशीसाठी सोनिया गांधींच्या या आहेत मागण्या

काँग्रेस नेत्या आणि त्यांची कन्या प्रियंका गांधी यांनीही कार्यालयात हजर राहता यावे अशी परवानगी सोनिया गांधींनी ईडीकडे मागितल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, चौकशी खुल्या आणि हवेशीर खोलीत करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. याशिवाय चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांची कोरोना चाचणीही व्हायला हवी. सोनिया गांधींना नुकतीच कोरोनाची लागण झाली होती आणि काही दिवसांपूर्वीच त्या बऱ्या झाल्या आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांचीही ईडीने सलग पाच दिवस चौकशी केली होती. मात्र, यावेळी सोनिया गांधींची फार काळ चौकशी होणार नसल्याचे बोलले जात होते. दरम्यान आज सोनिया गांधी यांची तीन-साडेतीन तास चौकशी करण्यात आली.

congress sonia gandhi interrogation by ED monica sharma in three round priyanka gandhi will present
National Herald Case: काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण? कसे अडकले सोनिया आणि राहुल गांधी

सोनिया गांधी यांची तीन फेऱ्यांमध्ये चौकशी

सोनिया गांधी यांची तीन भागात चौकशी केली जाऊ शकते, असे अंमलबजावणी संचालनालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, ही चौकशी राहुल गांधींइतकी जास्त काळासाठी होणार नाही. पहिल्या भागात सोनिया गांधी यांना त्यांच्या शेअरहोल्डिंग आणि कर भरणाविषयी विचारले जाईल.यानंतर, दुसऱ्या फेरीत, असोसिएटेड जर्नल आणि यंग इंडियन यांना त्यांच्या संलग्नतेबद्दल विचारले जाईल. याशिवाय तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात काँग्रेस आणि कंपन्यांचा संबंध काय आहे याबद्दल प्रश्न विचारले जातील.

congress sonia gandhi interrogation by ED monica sharma in three round priyanka gandhi will present
भुजबळ, राष्ट्रवादीसह मविआच्या नेतृत्वामुळं ओबीसी आरक्षण मिळालं - शरद पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.