KedarNath Bachav : काँग्रेसकडून दिल्लीत केदारनाथ बचाव यात्रेची सुरुवात, जाणून घ्या काय आहे कारण?

Congress : केदारनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनीदेखील दिल्लीत निर्माण होत असलेल्या मंदिराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेसकडून दिल्लीत केदारनाथ बचाव यात्रेची सुरुवात, जाणून घ्या काय आहे कारण?
KedarNath Bachav : sakal
Updated on

Delhi: राजधानी दिल्ली येथे केदारनाथ मंदिराची प्रतिकृती निर्माण केली जाणार असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या उत्तराखंडमधील नेत्यांनी बुधवारी केदारनाथ बचाओ यात्रेचे आयोजन केले आहे.

हरिद्वार येथील ‘हर की पौडी’येथे पूजा आणि यज्ञविधीचे आयोजन करून या यात्रेची सुरूवात केली. उत्तराखंडचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करण महारा आणि प्रदेश उपाध्यक्ष मथुरादत्त जोशी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

काँग्रेसकडून दिल्लीत केदारनाथ बचाव यात्रेची सुरुवात, जाणून घ्या काय आहे कारण?
Aarakshan Bachav Janyatra: वंचित काढणार 'आरक्षण बचाव जनयात्रा'; प्रकाश आंबेडकरांनी केली मोठी घोषणा

१६ दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत हे देखील या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. याआधी केदारनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनीदेखील दिल्लीत निर्माण होत असलेल्या मंदिराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

‘चारधाम’चे पावित्र्य जाईल

‘‘चारधाम यात्रा ही आपल्या धार्मिक परंपरांचे प्रतीक असून त्यांच्या पावित्र्याला धक्का लागेल अशा कोणत्याही गोष्टीला आम्ही विरोध करू,’’ असे मत हरिश रावत यांनी व्यक्त केले आहेत. दिल्लीत बांधण्यात येणाऱ्या मंदिरामुळे चारधाम यात्रेचे पावित्र्य जाण्याची भीती काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेसकडून दिल्लीत केदारनाथ बचाव यात्रेची सुरुवात, जाणून घ्या काय आहे कारण?
Dharavi Bachav Morcha: "भाजपच्या जावयाला आंदण देण्यासाठी मुंबई महाराष्ट्रानं मिळवली नाही"; ठाकरेंची सडकून टीका

या मंदिराचे नाव केदारनाथ मंदिर असेच ठेवण्यात येणार असून त्या नावे देणगी स्वीकारण्यात येणार असल्यानेही अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदविला आहे. त्याचप्रमाणे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धानी हे दिल्लीत बांधण्यात येणाऱ्या मंदिराच्या भूमीपूजन समारंभाला उपस्थित राहिल्याबद्दल काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.

काँग्रेसकडून दिल्लीत केदारनाथ बचाव यात्रेची सुरुवात, जाणून घ्या काय आहे कारण?
Dharavi Bachav Morcha: "मातोश्री 2 च्या विकासासाठी धारावीच्या विकासाला विरोध"; भाजपच्या 'या' आरोपाला अंधारेंचं प्रत्युत्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.