राजकीय उलथापालथ होणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्षानं घेतली शरद पवारांची भेट

Sharad Pawar D K Shivakumar
Sharad Pawar D K Shivakumaresakal
Updated on
Summary

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीचं अनेक राजकीय अर्थ काढले जाताहेत.

कर्नाटक : जस-जशी निवडणूक जवळ येत आहे, तशा राजकीय घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार आज (Sharad Pawar) कर्नाटक (Karnataka) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पक्षाच्या बंगळूरूमधील कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. पण, त्याआधीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. कर्नाटकात पुढील वर्षाच्या सुरूवातीला विधानसभेची निवडणूक (Karnataka Assembly Election) होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय.

Sharad Pawar D K Shivakumar
कर्नाटकात राजकीय वातावरण तापलं; लवकरच मंत्रिमंडळात होणार फेरबदल

याच पार्श्वभूमीवर बंगळूरूमधील (Bangalore) बनसवाडीतील कार्यालयाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते आज झालं. त्यासाठी पवारांचे दुपारी बंगळूरू विमानतळावर आगमन झालं होतं. त्यानंतर शिवकुमारांनी त्यांची भेट घेतली. याबाबत त्यांनीच ट्विटरवरून माहिती दिलीय. पवारांसोबतच्या भेटीचा फोटोही त्यांनी ट्विट केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही या भेटीचे फोटो फेसबुकवर पोस्ट करण्यात आले आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगितलं जात आहे. पण, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीचं अनेक राजकीय अर्थ काढले जाताहेत.

Sharad Pawar D K Shivakumar
आरोपी मिश्राचा जामीन फेटाळताच राकेश टिकैत म्हणाले..

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आहेत. भाजपविरोधी आघाडीत पवारांच्या भूमिकेला महत्व असतं, त्यामुळं कर्नाटकात आगामी निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का, याकडं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय. दरम्यान, कर्नाटकातही मराठी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळं पवारांनी प्रामुख्यानं या भागावर लक्ष केंद्रीत केल्याचं सांगितलं जात आहे. 2018 मध्येही राष्ट्रवादीचे उमेदवार विधानसभेच्या रिंगणात होते. रायबाग, हुक्केरी, बेळगाव उत्तर, सौंदत्ती, विजयपूर, सिंदगी, बसवकल्याण, रायचूर, शिराहत्ती, हुबळी-धारवाड, कारवार, बळ्ळारी नगर, हरपनहल्ली आणि बेंगलुरूमधील महालक्ष्मी या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार होते. आगामी निवडणुकीत बंगळूरू शहरासह महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवार उभे केले जाऊ शकतात. त्यामुळं पवारांच्या आजच्या कर्नाटक दौऱ्याला महत्व प्राप्त झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.