Congress: काँग्रेसचा ब्राह्मण मतांवर डोळा, हरियाणात ब्राह्मण उपमुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन

'हरियाणामध्ये आमचं सरकार आल्यास उपमुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचा असेल'; काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांचं वक्तव्य
Congress
CongressEsakal
Updated on

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता काँग्रेस पक्षाने ब्राह्मण समाजाला आकर्षित करण्यास सुरूवात केली आहे. ब्राह्मणांना आकर्षित करण्यासाठी रविवारी रोहतकच्या महर्षी दयानंद विद्यापीठात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांचा गौरव करण्यात आला. (Latest Marathi News)

तर काँग्रेसचे राज्यसभा सदस्य दीपेंद्र हुड्डा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. काँग्रेसचे आमदार कुलदीप वत्स यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचवेळी भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास ब्राह्मण समाजाला उपमुख्यमंत्री पद दिले जाईल, असे आश्वासन दिले आहे.

Congress
Anil Ambani: अनिल अंबानींची कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, किती कोटींना होणार विक्री?

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी रविवारी ब्राह्मण उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा तसेच नोकरीत आरक्षण देण्याचे आश्वासन त्यांनी देले आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग (EWS) अंतर्गत काँग्रेस सत्तेवर आल्यास ब्राह्मण आयोग स्थापन करण्यात येईल असंही आश्वासन त्यांनी दिलं आहे. (Marathi Tajya Batmya) हरियाणामध्ये एकूण लोकसंख्येच्या सुमारे १२% ब्राह्मण समाज आहे.

Congress
ED Raids Aam Aadmi Party MLA : 'आप'च्या नेत्यांवर ईडीची कारवाई सुरूच, आता आमदाराच्या घरावर छापा

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा म्हणाले की, हरियाणात काँग्रेसचे सरकार आल्यास ब्राह्मण आयोग स्थापन केला जाईल. यासोबतच EWS ला 10% आरक्षण दिले जाईल. तसेच धौलीदारांनाही मालकी हक्क दिले जातील. हरियाणात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा हे निर्णय घेतले जातील.

Congress
Accident News : दोन ट्रक अन् कारचा भीषण अपघात; पाच वर्षांच्या चिमुरडीसह कारमधील सात जण ठार

हुड्डा यांनी आठवण करून दिली की, काँग्रेसने ब्राह्मण समाजातील व्यक्तीला हरयाणा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनवले. ते पुढे म्हणाले की, त्यांच्या पक्षाने कुलदीप शर्मा या ब्राह्मण नेत्याला विधानसभेचे अध्यक्ष बनवले.

Congress
मोठी बातमी! नितीन गडकरींचं प्रकरण ताजं असतानाच हिंडलगा कारागृहात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, बेळगावात खळबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.