Oommen Chandy Passed Away: केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचं आज सकाळी निधन झालं
Oommen Chandy Passed Away
Oommen Chandy Passed AwayEsakal
Updated on

केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओमन चांडी यांचं आज पहाटे (मंगळवारी 18 जुलै) निधन झालं आहे. ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्येही सहभागी झाले होते. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन आणि चांडी यांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमन चांडी हे 79 वर्षांचे होते.

ओमन चांडी यांना घशाचा आजार झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी जर्मनीला नेण्यात आलं होतं.

केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचं आज सकाळी निधन झालं आहे. ते 79 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर बंगळुरूमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या मुलाने सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे. 2004-2006, 2011-2016 या काळामध्ये ते केरळचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे.

केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन यांनी ट्वीट करत ओमन चांडी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चांडी यांचं निधन झाल्याचं त्यांनी ट्वीट केलं आहे.

Oommen Chandy Passed Away
Monsoon Assembly Session: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हसन मुश्रीफांची ओळख करुन देताच सभागृहात 'जय श्रीराम'चे नारे

ओमन चांडी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. 2019 पासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. ओमन चांडी यांना घशाचा आजार झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी जर्मनीला नेण्यात आलं होतं.

Oommen Chandy Passed Away
Monsoon Assembly Session: 'त्यांची-आमची जुनी ओळख!' पहिल्याच दिवशी जयंत पाटलांचा अजित पवारांना मिश्किल चिमटा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.