Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमध्ये त्रिशंकु? अपक्ष उमेदवार ठरू शकतात किंगमेकर

हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी अनेक जागा महत्त्वाच्या आहेत
Himachal Pradesh
Himachal PradeshEsakal
Updated on

हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी अनेक जागा महत्त्वाच्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत हिमाचल प्रदेश मध्ये निकालांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. काँग्रेस भाजपमध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. दोन्ही पक्ष अवघ्या काही मतांनी मागेपुढे आहेत. या चढाओढीमध्ये महत्वाचा मुद्दा ठरतो आहे तो म्हणजे अपक्ष. दोन्ही पक्ष समान किंवा अगदी थोड्या फरकाने जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतील आणि त्यांना अपक्षांचा पाठिंबा मिळाला तर हिमाचलमध्ये एकूणच चित्र बदलू शकते.

सध्या अपक्ष हा मुद्दा महत्वाचा दिसून येत आहे. सध्याच्या घडीला काँग्रेसच्या उमेदवाराला 5347 मते आहेत आणि ते आघाडीवर आहेत तर थोड्या फरकाने म्हणजेच 5336 मतांनी भाजपचा उमेदवार आहे. यामध्ये गेम चेंजर म्हणून अपक्ष उमेदवार कृपाल सिंग पारमार हे 529 मतांवर आहेत त्यामुळे ते महत्वाचे ठरू शकतात.

हे ही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

त्यामुळे हिमाचालमध्ये त्रिशंकु होण्याची शक्यता असून अपक्ष उमेदवार किंगमेकर ठरू शकतो. सध्या हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे. अशातच काँग्रेस पुढे जात आहे हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. तर काँग्रेस आणि अपक्ष एकत्रित आले तर हिमाचलचे राजकीय दृश बदलू शकते. तर भाजप अपक्षांना सोबत घेऊ शकले तरी पुढच्या निवडणुकांसाठी भाजपला आणखी तयारी करावी लागेल.

Himachal Pradesh
Himachal Election : निकाल राहिला लांब कॉंग्रेसच्या 'या' नेत्या म्हणतात मीच होणार मुख्यमंत्री

भाजपकडून तिकीट न मिळाल्याने कृपाल परमार यांनी हिमाचल प्रदेशातील फतेहपूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे. भाजपनेही त्यांच्या बंडखोरीवर कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. भाजपच्या नेत्यांनी कृपाल परमार यांची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

Himachal Pradesh
Himachal Election : हिमाचलच्या 'कांगडा'मध्ये 9 जागा जिंकणाऱ्या पक्षानं बनवली 'सरकार'; जाणून घ्या कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.