Congress VS Income Tax Department: "जेव्हा घरात लग्न असते..."; 65 कोटी कर वसुली विरोधात सुनावणीत काँग्रेसचे स्पष्टीकरण

Congress VS Income Tax Department: आयकर विभागाने काँग्रेसची चार बँक खाती गोठवली होती. पण आयकर अपील प्राधिकरणाने (ITAT) या हे खाते पुन्हा सुरळीत सुरु केली.
Congress VS Income Tax Department
Congress VS Income Tax Departmentesakal
Updated on

Congress VS Income Tax Department: आयकर विभागाने काँग्रेसची चार बँक खाती गोठवली होती. पण आयकर अपील प्राधिकरणाने (ITAT) या हे खाते पुन्हा सुरळीत सुरु केली. त्यामुळे काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. मात्र आता काँग्रेसने गंभीर आरोप केला आहे.

आयकर विभागाने खात्यातून ६५ कोटी रुपये काढल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस विरुद्ध आयकर विभाग या खटल्याची आज ITAT न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी काँग्रेसत्या बाजुने वकील विवेक तन्खा यांनी युक्तिवाद केला.

वकील विवेक तन्खा म्हणाले, जेव्हा घरी लग्न असते तेव्हा एक माणूस घरात सर्व पैसे जमा करतो. कारण लग्न चांगले झाले पाहीजे. तसेच कोणताही राजकीय पक्ष जेव्हा निवडणुकीत उतरतो तेव्हा सर्व फंड पक्षासाठी महत्वाचा असतो.

Congress VS Income Tax Department
Manipur Voilence: हिंसाचाराला कारणीभूत ठरलेला 'तो' आदेश हायकोर्टानं बदलला; महाराष्ट्रातील एका खटल्याचा घेतला आधार

यावर आयकर विभागने म्हटेल ही कराची मागणी नाही, जी निवडणुकीपूर्वी केली जात आहे. आम्ही पासून २०२१ पासून हे पाहत आहोत. काँग्रेसने पैसे न दिल्यास त्यानुसार कारवाई करू. आम्ही आमच्या अधिकारांचा वापर केला आहे, काँग्रेस वारंवार कर भरत नव्हती त्यामुळे हा आमचा शेवटचा पर्याय होता. दरम्यान काँग्रेसच्या याचिकेवर ITAI मध्ये युक्तिवाद पूर्ण झाला असून निर्णय राखून ठेवला आहे. (Latest Marathi News)

आयकर विभागाने पक्षाच्या तीन बँक खात्यांमधून बेकायदेशीरपणे ६५ कोटी रुपये काढल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे ६५ कोटींच्या वसुलीसाठी ITAI चा दरवाजा ठोठावण्यात आला. खंडपीठासमोर होणाऱ्या सुनावणीच्या निकालाची वाट न पाहता आयकर विभागाने कारवाई केल्याचे काँग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Congress VS Income Tax Department
Arvind Kejriwal: ...तर केजरीवालांना येत्या 3-4 दिवसांत अटक होणार! दिल्लीच्या मंत्र्याचा खळबळजनक दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.