आजवर केली नाही अशी गोष्ट काँग्रेस पंजाब निवडणुकीसाठी करणार!

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले संकेत
Rahul Gandhi Letter to Twitter CEO
Rahul Gandhi Letter to Twitter CEOSakal
Updated on

जालंधर : विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांसाठी आजवर कधीही केलं नाही अशी गोष्ट यंदा काँग्रेस पंजाब निवडणुकांसाठी (Punjab Elections) करणार आहे. याचे संकेत खुद्द काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिले आहेत. एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. (Congress will do something for Punjab elections that it has never done before)

पंजाबमध्ये सध्या प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यामध्ये स्पर्धा सुरु असून त्यांच्यातील स्पर्धेवर तोडगा काढल्यास पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या प्रचारावर त्याचा परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी म्हणाले, दोन लोक पंजाबचं नेतृत्व करु शकत नाहीत कोणातरी एकालाच नेतृत्व करता येईल.

Rahul Gandhi Letter to Twitter CEO
महाराष्ट्राला दिलासा! बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची मागणी आम्ही लवकरात लवकर पूर्ण करु. शक्यतो काँग्रेस कधीही मुख्यंत्रीपदाचा चेहरा जाहीर करत नाही. पण जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल तर आम्ही त्यांची इच्छा पूर्ण करु. पण हा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच घेतला जाईल, तेच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवतील. पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी ते जालंधर येथे आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी सिद्धू आणि चन्नी व्यासपीठावर उपस्थित होते.

दरम्यान, नुकतेच काँग्रेसनं पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य करताना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार हा १४ फेब्रुवारीला निवडणूक पार पडल्यानंतरच घेतला जाईल असं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.