नवी दिल्ली : दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली आहे. या बैठकीत पाच राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवावर आत्मचिंतन केलं जाणार आहे. (Congress Working Committee meeting begins meeting started)
या बैठकीपूर्वीच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांनी म्हटलं की, आमचा रस्ता एकता, अखंडतेचा आहे. तर दुसरा मार्ग भाजपचा जो धर्म आणि धुर्वीकरणाचा आहे. पंतप्रधान मोदी आणि अरविंद केजरीवाल हे एकसारखचं बोलतात. अशा प्रकारे आग लावणं सोप काम असतं पण ती विझवणं कठीण काम आहे. राहुल गांधींनी अध्यक्ष झालं पाहिजे यामुळं पक्षाची एकजुट राहिल.
दरम्यान, G23च्या सदस्यांनी तर गांधी परिवाराव्यतिरिक्त व्यक्तीला अध्यक्षपदी बसवण्याची मागणी केली असून यासाठी मुकूल वासनिक यांच्या नावाची शिफारिसही केली आहे. पण अशा प्रकारे काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन दोन गट पडल्यानं पक्ष श्रेष्ठींसाठी याबाबत निर्णय घेणं अवघड असणार आहे.
या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अंबिका सोनी, अशोक गेहलोत आदी सदस्य पदाधिकारी उपस्थित आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.