लखनौ : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ‘मिशन उत्तर प्रदेश’ हाती घेतले असून पक्षाच्या छाननी समितीची बैठक नुकतीच पार पडली. काँग्रेसचे सरचिटणीस भन्वर जितेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली लखनौत पक्षाच्या मुख्यालयात ही बैठक झाली. यावेळी, छाननी समितीतील प्रियांका गांधी वद्रा, दीपेंदर सिंह हुडा, वर्षा गायकवाड, अजय सिंह लल्लू आदी सदस्यही उपस्थित होते.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. उमेदवारांची यादी लवकरच अंतिम करून पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक समितीला पाठविली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांची यादी टोपणनावांसह जाहीर करण्याची पंरपराही बदलण्याची शक्यता आहे.
पक्षाच्या छाननी समितीने उत्तर प्रदेशातील १५० विधानसभा मतदारसंघातील संभाव्य १५० उमेदवारांची छाननी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.