PM Modi: "हिंदूंविरोधात कट-कारस्थान रचलं जातंय"; PM मोदींनी राहुल गांधींच्या विधानावर केलं सविस्तर भाष्य

लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी काल सभागृहात बोलताना हिंदू सामाजावरुन भाजप, रा. स्व. संघाला टार्गेट केलं होतं.
PM Modi: "हिंदूंविरोधात कट-कारस्थान रचलं जातंय"; PM मोदींनी राहुल गांधींच्या विधानावर केलं सविस्तर भाष्य
Updated on

नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी काल सभागृहात बोलताना हिंदू सामाजावरुन भाजप, रा. स्व. संघाला टार्गेट केलं होतं. त्यांच्या या विधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रत्युत्तर दिलं. हिंदूंविरोधात खोटे आरोप लावून कट-कारस्थान रचलं जात आहे, असा आरोप मोदींनी केला. (Conspiracy is being hatched against Hindus says PM Modi in Loksabha on reply to Rahul Gandhi statement)

मोदी म्हणाले, "काल जे झालं ते या देशाची कोटी कोटी जनता वर्षानुवर्षे माफ करणार नाही. हिंदू सहनशील आहे, हिंदू आपलेपणानं जगणारा समुह आहे. यामुळं भारताची लोकशाही, त्यातील विविधता फुलू शकली. आज हिंदूंवर खोटे आरोप लावण्याचं कट-कारस्थान रचलं जात आहे. हिंदू हिंसक असतात असं काल सभागृहात म्हटलं गेलं. हेच आपले संस्कार आहेत का? हेच तुमचं चारित्र्य, विचार आहे का? हा देश हे शेकडो वर्षे हे विसरणार नाही, अशा शब्दांत मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

PM Modi: "हिंदूंविरोधात कट-कारस्थान रचलं जातंय"; PM मोदींनी राहुल गांधींच्या विधानावर केलं सविस्तर भाष्य
Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेची वयोमर्यादा वाढली, आता ६५ वर्षांपर्यंतच्या महिलांना मिळणार लाभ

हे ते लोक आहेत ज्यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द रुढ करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सहकाऱ्यांनी हिंदू धर्माची तुलना डेंग्यु, मलेरिया अशा शब्दांशी केली होती. हा देश हे कधी माफ करणार नाही. त्यामुळं एक विचारपूर्वक केलेल्या रणनीतीनुसार यांची संपूर्ण इकोसिस्टिम हिंदू परंपरा, हिंदू समाज, या देशाची परंपरेचा अपमान करण्याचा फॅशन बनवलं आहे. त्याला संरक्षण देण्याचं काम आपल्या राजकीय स्वार्थासाठी अशी तत्वं करत आहेत, असंही मोदी यावेळी म्हणाले.

PM Modi: "हिंदूंविरोधात कट-कारस्थान रचलं जातंय"; PM मोदींनी राहुल गांधींच्या विधानावर केलं सविस्तर भाष्य
PM Modi: मोदी बोलायला उभे राहताच विरोधकांचा मोठा गोंधळ; लोकसभा अध्यक्ष विरोधकांवर प्रचंड संतापले

राहुल गांधींनी काल सभागृहात दाखवलेल्या शंकराच्या प्रतिमेवरुन मोदींनी त्यांना टोला लगावला. मोदी म्हणाले, ईश्वराचं दर्शन होत असतं प्रदर्शन नाही. देवी-देवतांचा अपमान हा १४० कोटी देशवासियांच्या हृदयावर जखम केल्यासारखं आहे. वैयक्तिक राजकारणासाठी ईश्वराच्या रुपाचा अशा प्रकारे खेळ करणं हे देश कसं खपवून घेईल? कालची सभागृहातील ही दृशे बघून आता हिंदू समाजानं विचार करायला हवा अन् ओळखायला हवं की, हे अपमानजनक विधान केवळ योगायोग आहे की, कुठल्या प्रयोगाची तयारी आहे, अशा शब्दांत मोदींनी राहुल गांधींच्या हिंदू विधानावर भाष्य केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.