नवी दिल्ली : ‘‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातच संपविण्याचा कट रचला जात आहे,’’ असा आरोप आम आदमी पक्षाचे(आप) खासदार संजय सिंह यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केला.
अरविंद केजरीवाल हे त्यांची तब्येत खराब राहावी, यासाठी जाणूनबुजून तुरुंगात जेवत नाहीत असा आरोप दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी अलीकडेच केला होता. त्या पार्श्वभूमीवर सिंह यांच्या आरोपांकडे पाहिले जात आहे.
‘‘भाजपचे नेते केजरीवाल यांच्या आरोग्याशी खेळत आहेत. त्यांच्या हत्येचा कट रचला जात आहे,’’ असा आरोप सिंह यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘‘ या आधी केजरीवाल हे त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढावे, यासाठी अधिक मिठाई खात आहेत, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. तर आता अगदी त्या उलट आरोप करत केजरीवाल हे जेवत नसल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत.
’’ स्वत:च्या जिवाला धोका उत्पन्न होईल, असे कृत्य कोणी करेल का? असा सवालही सिंह यांनी यावेळी उपस्थित केला. ‘‘केजरीवाल हे २१ मार्चपासून तिहार तुरुंगात आहेत. या कालावधीत त्यांचे वजन आठ किलोने कमी झाले आहे.
गंभीर आजारामुळे केजरीवाल यांचे वजन कमी झाले असावे, अशी शंका त्यांच्या आरोग्यविषयक अहवालात व्यक्त करण्यात आली होती. दिल्लीचे नायब राज्यपाल ज्या पद्धतीची विधाने करत आहे ते पाहता केजरीवाल यांच्या जिवाला धोका असल्याचीच पुष्टी होते,’’ असे सिंह म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.