महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजे 'उचापती' संघटना, आम्ही त्यांचा बंदोबस्त करू; मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

बेळगावातील राजकीय घडामोडीवर बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत त्यांची जीभ घसरली.
CM Basavaraj Bommai
CM Basavaraj Bommaiesakal
Updated on
Summary

महाराष्ट्र एकीकरण समितीनं समितीच्या विरोधात प्रचारासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना काळे झेंडे दाखवण्यास सुरुवात केली आहे.

हुबळी : महाराष्ट्र एकीकरण समिती (Maharashtra Ekikaran Samiti) ही उचापती लोकांची संघटना आहे. आम्ही त्यांचा बंदोबस्त करू, अशी दर्पोक्ती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.

हुबळी येथे भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बेळगावातील राजकीय घडामोडीवर बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत त्यांची जीभ घसरली. समितीला त्यांनी थेट उचापतीची संघटना म्हणून संबोधलं. एवढ्यावरच ते न थांबता बेळगावातील जनताच समितीला पाच वर्षे घरी बसवेल, असं सांगितलं.

ते पुढं म्हणाले की, निवडणुकीत (Karnataka Assembly Election 2023) महाराष्ट्र एकीकरण समिती लोकांचे माथे बिघडविण्याचं काम करीत आहेत. बेळगावच्या जनतेला हे सर्व ठाऊक आहे. तेथील लोकच त्यांना उत्तर देतील. बेळगावात (Belgaum) राष्ट्रीय पक्षाच्या प्रचारासाठी कर्नाटकातील नेत्यांकडून महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावलं जात आहे.

CM Basavaraj Bommai
Jaykumar Gore : स्मशानभूमीलगत अपघात, आमदार आता काय यातून वाचत नाही; गोरेंनी शेअर केला थरारक अनुभव

महाराष्ट्र एकीकरण समितीनं समितीच्या विरोधात प्रचारासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना काळे झेंडे दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं सध्या राष्ट्रीय पक्षांची देखील प्रचारासाठी कोंडी झाली आहे. समिती पुन्हा एकदा वरचढ ठरू लागल्याने बोम्मई यांना देखील त्याची दखल घ्यावी लागली आहे. त्यामुळं त्यांनी हुबळी येथे महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात आगपाखड केली.

CM Basavaraj Bommai
Narendra Modi : स्वच्छ चारित्र्याचा पंतप्रधान देशाला मिळाल्यामुळं..; काय म्हणाले गृहराज्यमंत्री?

यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यावर देखील टीका केली. पंतप्रधान खेडेगावापर्यंत पोहोचू नये, त्यांनी दिल्लीतच राहावे, अशी सिद्धरामय्या यांची भावना आहे. काँग्रेसला बदल आवडत नाही. राज्यातील जनता संकटात सापडलेली असताना पंतप्रधान मोदी यांनीच राज्याला मोठी आर्थिक मदत देऊ केली आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असतानाच राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले होते. त्यावेळी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे राज्यात आले होते का, असा सवालही त्यांनी केला.

CM Basavaraj Bommai
Political News : अजित पवारांमुळेच शिवसेनेचे आमदार फुटले; रामदास कदम यांचा मोठा गौप्यस्फोट

संतोष यांच्या वक्तव्याबाबत बोलणं टाळलं

हुबळीत पत्रकारांनी बी. एल. संतोष यांच्या लिंगायत मताबाबत केलेल्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री बोम्मई यांना छेडले असता, याबाबत आता काहीच बोलणे नको, म्हणत अधिक भाष्य टाळलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.