India Alliance: ‘इंडिया’तील वाद चव्हाट्यावर; आघाडीतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष भिडले

आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत
India Alliance
India AllianceEsakal
Updated on

‘इंडिया’ आघाडीतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

‘दिल्ली सेवा’विषयक विधेयकावर काँग्रेसने समर्थन दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना पत्र पाठविले होते.

यानंतर लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून आघाडी होईल, असे चित्र रंगविले जात होते. परंतु ‘आप’च्या मंत्री आतिशी यांनी विधानसभा व दिल्ली लोकसभेच्या सातही जागा ‘आप’ लढविणार व या दोन्ही निवडणुकांमध्ये चांगले यश प्राप्त करेन, असा दावा केला आहे. यामुळे दिल्लीत काँग्रेसला पाय ठेवू देण्यास ‘आप’ तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘काँग्रेसने ‘आप’पासून दूर राहावे’

काँग्रेसचे नेते व माजी खासदार संदीप दीक्षित हे काँग्रेसने ‘आप’पासून दोन हात दूर राहावे, या भूमिकेवर ठाम आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे विश्वसनीय नेतृत्व नाही. ते कधी कोणती भूमिका घेतील, हे सांगता येत नाही. ते आपल्या सोयीनुसार भूमिका बदलतात, असे दीक्षित यांनी म्हटले आहे.

India Alliance
Loksabha Election : भाजप मोठा डाव टाकणार? हायकमांडकडून 'या' बड्या नेत्याला लोकसभेसाठी ऑफर; निवडणुकीत वाढणार चुरस

केजरीवालांच्या टीकेला आक्षेप

केजरीवाल यांनी छत्तीसगडमधील शाळांतील परिस्थितीवरून काँग्रेसवर टीका करताना ही स्थिती भयावह असल्याचे मत मांडले होते. काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी या टीकेला आक्षेप घेतला. ‘‘केजरीवाल यांना छत्तीसगड आणि दिल्ली अशी तुलना करायचे काही कारण नव्हते, विद्यमान स्थितीची तुलना त्यांनी मागील रमणसिंह सरकारशी करणे गरजेचे होते,’’ असे खेडा यांनी म्हटले आहे.

India Alliance
Chandrayaan-3 Update : चांद्रयानचं आणखी एक पाऊल पुढे! उरले फक्त २५ किमी; मॉड्यूलचे अंतिम डीबूस्टिंगही यशस्वी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.