Bajrang Dal : बजरंग दलातर्फे आज कर्नाटकात हनुमान चालिसाचे पाठ

वाद काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा; प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदू संघटनेने सोडला संकल्प
Controversy Congress Hanuman Chalisa Bajrang Dal today in Karnataka
Controversy Congress Hanuman Chalisa Bajrang Dal today in KarnatakaSakal
Updated on

बंगळूर : काँग्रेसला जोरदार प्रत्यूत्तर देण्याचा संकल्प बजरंग दलाने सोडला आहे. त्यासाठी गुरुवारी कर्नाटकमध्ये हनुमान चालिसाचे पाठ आयोजित करण्यात येतील. काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे.

जात आणि धर्माच्या आधारावर समाजात शत्रुत्व पसरविणाऱ्याऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याची ग्वाही काँग्रेसने दिली आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील तसेच कर्नाटकातील सत्ताधारी भाजपच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसला धारेवर धरले आहे.

या पार्श्वभूमीवर बजरंग दलातर्फे एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, धर्म धोक्यात आला असल्याचा हा काळ आहे. अशावेळी एकमेकांच्या साथीत ठामपणे उभे राहणे हाच भविष्याचा मार्ग आहे. आपण आपले मतभेद बाजूला ठेवून धर्माच्या रक्षणासाठी एक येऊन पुढाकार घेतला आहे. विश्व हिंदू परिषदेनेही (विहिंप) बजरंग दलाला पाठिंबा दर्शविली आहे.

दक्षिण कन्नडमध्ये निदर्शने

मंगळवारी सायंकाळी काँग्रेसच्या मंगळुरमधील दक्षिण कन्नड जिल्हा कार्यालयासमोर बजरंग दलातर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या प्रतींचे यावेळी दहन करण्यात आले.

छत्तीसगडमध्ये बंदीबाबत विचार करू : भूपेश बघेल

रायपूर : छत्तीसगडमध्ये बजरंग

दलासंदर्भात सध्या अस्तित्वात असलेल्या परिस्थितीनुसार विचार करून योग्य कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल. गरज पडल्यास बंदीबाबत विचार करू, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले.कर्नाटकच्या बाबतीत होणारे निर्णय किंवा कारवाई छत्तीसगडच्या बाबतीत लागू पडेलच असे नाही. याचे कारण दोन्ही राज्यांतील परिस्थिती वेगळी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बजरंग दल गुंडांची संघटना : दिग्विजय

काँग्रेसचे मध्य प्रदेशातील ज्येष्ठ नेते तसेच राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांनीही या वादात उडी घेतली. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा संदर्भ देत ट्विट केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. दिग्विजय यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मोदीजी यांचा धर्म हिंदुत्व आहे, जो हिंदू किंवा सनातन धर्म नाही. सावरकरजी यांनी म्हटल्याप्रमाणे जसा हिंदुत्वाचा हिंदू धर्माशी संबंध नाही तसाच बजरंग दलाचा हनुमानाशी संबंध नाही. ती एक गुंडांची संघटना आहे.

काँग्रेसचे आश्वासन लाजीरवाणे : दौनेरीया

नवी दिल्ली : बजरंग दलाचे राष्ट्रीय निमंत्रक नीरज दौनेरिया यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठविली. बजरंग दलावर बंदी घालण्याचे काँग्रेसचे आश्वासन लाजीरवाणे आहे. काँग्रेसने धर्माच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. समाजाच्या विकास आणि हितासाठी काम करणाऱ्या संघटनेची त्यांनी असंख्य दहशतवादी कारवायांना खतपाणी घातलेल्या गटाशी तुलना केली आहे, जे लाजीरवाणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.