Rajiv Gandhi: काय योगायोग पाहा! ज्यांना मारलं, त्यांच्याच नावाने बनलेल्या हॉस्पिटलमध्ये आला मृत्यू

convicted in Rajiv Gandhi assassination case माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या संथानचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु होते, पण त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Rajiv Gandhi
Rajiv GandhiEsakal
Updated on

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या संथानचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु होते, पण त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. विशेष म्हणजे संथानचा मृत्यू राजीव गांधी यांच्या नावाने बनलेल्या हॉस्पिटलमध्येच झाला आहे. संथानने ज्यांना मारले, त्यांच्याच नावाच्या हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू होणे योगायोगच म्हणावा लागेल.

राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या संथानला दोषी ठरवण्यात आलं होतं. पण, त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली होती. ५५ वर्षांच्या संथानचे जानेवरी महिन्यामध्ये लिव्हर फेल झाले होते. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला इतर काही आरोग्य समस्या देखील होता. त्याचा मृत्यू झाल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे. (convicted in Rajiv Gandhi assassination case T Suthendraraja Santhan dies in hospital)

Rajiv Gandhi
राम मंदिराचे कुलूप कोणामुळे उघडले? जस्टीस पांडे, राजीव गांधी की काळे माकड...? अयोध्येचा रंजक अध्याय

१९९९ मध्ये सुप्रीम कोर्टाने २६ पैकी १९ जणांना राजीव गांधींच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलं होतं. यात मुरुगन, संथान, पेरिवलन नलिनी यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. तसेच पायास, रविचंद्रन, जयकुमार यांना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तमिळनाडूतील दहशतवादी संघटना Liberation Tigers of Tamil Eelam (LTTE) यांनी कट रचून आत्मघातकी हल्ल्यात राजीव गांधींची हत्या केली होती.

Rajiv Gandhi
PM in Lakshadweep: राजीव गांधी कुटुंबियांसोबत गेले होते लक्षद्वीपमध्ये, PM मोदींनी 2019 मध्ये केली होती टीका

सीबीआयनुसार, संथान एप्रिल १९९१ मध्ये श्रीलंकेवरुन तमिळनाडूमध्ये आला होता. १९९० मध्ये त्याने मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंगमध्ये प्रवेश घेतल होता. त्याच्या शिक्षणाचा खर्च LTTE करत होती. माहितीनुसार, संथान हा धार्मिक व्यक्ती होता. तो आपल्याच जगात जगायचा. नियमित तो देवाची पूजा करायचा. मंदिरात तो दिवसभर बसून असायचा. त्याने श्रीलंकेतील सर्व नातेवाईकांची संबंध तोडले होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.