'कॉर्बेव्हॅक्स' असेल भारतातील सर्वात स्वस्त लस; जाणून घ्या किंमत!

हैदराबादमधील बायोलॉजिकल ई या कंपनीने ही लस विकसित केली आहे.
vaccination
vaccinationFile photo
Updated on

हैदराबाद : भारतात आणखी एक स्वस्त आणि मस्त लस दाखल होणार आहे. हैदराबादमधील बायोलॉजिकल ई (Biological e) या कंपनीने ही लस विकसित केली असून 'कॉर्बेव्हॅक्स' (Corbevax) असं या लशीचं नाव आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही लस भारतातील सर्वात स्वस्त लस ठरु शकते. कारण या लशीच्या दोन डोसची किंमत ५०० रुपये ठेवण्याबाबत विचार सुरु आहे. म्हणजेच एका डोसची किंमत केवळ २५० रुपये असेल. पण या लशीच्या दोन्ही डोसची किंमत ४०० रुपयांहून कमीही होऊ शकते, असे संकेत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक महिमा दातला यांनी एका मुलाखतीत दिले आहेत. पण या लशीची किंमत अद्याप अंतिम झालेली नाही. (Corbevax will be the cheapest vaccine in India Know the price)

vaccination
पुण्यात घरोघरी जाऊन लसीकरणाचा पहिलाच प्रयोग

देशात सध्या उपलब्ध असलेल्या सीरमच्या कोविशिल्ड या लशीची किंमत राज्य सरकारसाठी ३०० रुपये प्रतिडोस आहे. तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये प्रतिडोस आहे. तर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची राज्य सरकारांसाठीची किंमत ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठीची किंमत १२०० रुपये प्रतिडोस आहे. तसेच हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीकडून उत्पादित करण्यात येत असलेली रशियन लस 'स्पुटनिक व्ही' ची किंमत प्रतिडोस ९९५ रुपये आहे.

कोर्बेव्हॅक्सची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु

दरम्यान, कोर्बेव्हॅक्स या लशीची सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु असून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परिणाम समाधानकारक आले आहेत. केंद्राने या लशीचे ३० कोटी डोस बुक केले आहेत. यासाठी १५०० कोटी रुपयांचा आगाऊ रक्कमही दिली आहे.

कशा पद्धतीची आहे लस? डोसमधील अंतर किती?

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, बायोलॉजिकल-ई नं विकसीत केलेली लस RBD प्रोटीन सबयूनिट (Protein subunit ) लस आहे. यामध्ये SARS-CoV-2 चे रिसेप्‍टर-बायंडिंग डोमेन (RBD) चे डिमेरिक फॉर्मचा अँटीजनप्रमाणे वापर होतो. लसीची क्षमता वाढवण्यासाठी यामध्ये अॅडज्युवेंट CpG 1018 लाही मिसळण्यात आलं आहे. बायोलॉजिकल-ई ही लस दोन डोसमध्ये देण्यात येणार आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येईल. पुढील काही महिन्यांत ही उपलब्ध होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()