Coromandal Express : दहा-पंधरा जण अचानक अंगावर कोसळले अन्...; अपघातग्रस्त ट्रेनमधल्या प्रवाशानं सांगितला थरारक अनुभव

ओडिशामध्ये तीन ट्रेन्सचा अपघात झाला असून यामध्ये ५० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
Coromandal Express
Coromandal Express
Updated on

Coromandal Express Accident : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात तीन रेल्वे गाड्यांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात ५० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एका अपघातग्रस्त एक्स्प्रेसमधील प्रवाशानं अपघात झाल्याचा तो क्षण कसा होता? याचा थरारक अनुभव सांगितला आहे. (Coromandal Express thrilling experience shared by one of passenger from accident train)

या भीषण अपघातातून बचावलेला पण प्रत्यक्ष या दुर्घटनेचा अनुभव घेतलेल्या एका प्रवासी तरुणानं एएनआयशी बोलताना सांगितलं की, "माझा डोळा लागला होता म्हणून मी झोपलो होतो. त्यावेळी जेव्हा गाडी पलटी झाली तेव्हा माझी झोप उडाली. यावेळी आमची बोगी रिझर्व्हेशनचा डबा असल्यानं संपूर्ण भरलेली होती. पण जेव्हा आमची बोगी पलटली तेव्हा माझ्या अंगावर दहा-बारा लोक येऊन पडले, त्यामुळं मी सर्वांच्या खाली दबलो गेलो" (Train Accident latest News)

Coromandal Express
Coromandal Express: ओडिशातील भीषण रेल्वे अपघातानंतर अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले

"माझ्या हाताला आणि मानेला दुखापत झाली असल्यानं खूपच दुखत आहे. त्यानंतर आत्ता जे काही आपण पाहात आहात ते भीषण आहे. यानंतर मी कसाबसा बोगीच्या बाहेर आलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून सुन्न झालो. कारण यामध्ये काही प्रवाशांचा हात नव्हता, कोणाचा पाय नव्हता. काही प्रवाशांचा चेहराच विद्रुप झाला होता" (Latest Marathi News)

Coromandal Express
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली! इतर 19 अधिकाऱ्यांचीही ट्रान्सफर; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

असा झाला अपघात

शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघात इतका भीषण आहे की, रेल्वेचे अनेक डब्बे अक्षरशः कापले गेले आहेत. दोन एक्सप्रेस आणि एक मालगाडी अशा तीन गाड्यांमध्ये हा अपघात झाला आहे. सुरुवातीला एक ट्रेन रुळावरुन घसरली त्यानंतर त्यावर दुसरी गाडी आदळली आणि त्यांना दुसऱ्या रुळावरुन धावणारी मालगाडी धडकली, अशी माहिती ओडिशाच्या मुख्य सचिवांनी दिली.

Coromandal Express
Baby Ariha : जर्मनीत अडकलेली बेबी अरिहा लवकरच भारतात परतेल! परराष्ट्र मंत्रालयाचं आश्वासन

रेल्वेमंत्र्यांची मदत जाहीर

दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री यांनी अपघाताच्या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली असून उद्या ते घटनास्थळी भेट देणार आहेत. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली असून प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये तर गंभीर जखमींना २ लाख आणि किरकोळ जखमी झालेल्या लोकांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.