Coromandel Express Accident : मोठी अपडेट! अपघात दोन नाही तर तीन ट्रेनचा, 50 पेक्षा जास्त मृत्यू

Coromandel Express Accident
Coromandel Express Accident
Updated on

Coromandel Express Accident : ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेसचे 17 ते 18 डबे रुळावरून घसरले आणि दुसर्‍या रुळावर येणाऱ्या ट्रेनला धडकले. या अपघातात आतापर्यंत 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून सुमारे 200 प्रवासी जखमी झाले आहेत. हा दोन ट्रेनचा नाही तर तीन ट्रेनचा अपघात झाला आहे.

दोन पॅसेंजर ट्रेन आणि एक मालगाडी अशा तीन गाड्यांचा समावेश असलेला हा अपघात होता, अशी माहिती, ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली. Coromandel Express Accident

अधिकाऱ्यांनी सांगितले की कोरोमंडल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्टेशनवरून चेन्नई सेंट्रलकडे जात असताना बहंगा बाजार स्थानकावर संध्याकाळी ७.२० च्या सुमारास हा अपघात झाला.

दक्षिण पूर्व रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपघाती मदत गाड्या अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. अपघातानंतर जलद बचाव कार्य राबवत ३०० प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे, तर ५० हून अधिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. 700 प्रवासी अजूनही अडकून पडल्याची माहिती मिळत आहे.

ओडिशाचे विशेष मदत आयुक्त सत्यव्रत साहू यांनी सांगितले की, आतापर्यंत ४७ जणांना बालासोर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुळावरून घसरलेल्या डब्यांमध्ये अनेक लोक अडकले होते आणि स्थानिक लोक आपत्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांची सुटका करण्यासाठी मदत करत होते, परंतु अंधारामुळे ऑपरेशनमध्ये अडथळे येत होते. या अपघातात सुमारे २०० जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अजून मदतकार्य सुरू आहे त्यामुळे जखमी आणि मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()