Corona : सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे 20 हजारांहून अधिक नवे रुग्ण

भारतात कोरोना संसर्गाच्या (Coronavirus In India) प्रकरणांमध्ये वाढ झालीय.
Corona Case In India
Corona Case In Indiaesakal
Updated on
Summary

भारतात कोरोना संसर्गाच्या (Coronavirus In India) प्रकरणांमध्ये वाढ झालीय.

Corona Case In India : भारतात कोरोना संसर्गाच्या (Coronavirus In India) प्रकरणांमध्ये वाढ झालीय. आज पुन्हा एकदा कोविडची 20 हजारांहून अधिक नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. तर, गेल्या 24 तासांत 56 रुग्णांचा मृत्यू झालाय.

देशात सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. कारण, संसर्गाची हजारो प्रकरणं दररोज नोंदवली जात आहेत आणि बरं होण्याचा दर नवीन प्रकरणांपेक्षा कमी आहे. कोविडच्या आकडेवारीनुसार, देशात संसर्गाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1.40 लाख झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 56 रूग्णांच्या मृत्यूनंतर भारतात संसर्गानं मरण पावलेल्या लोकांची संख्या आता 5,25,660 झालीय. तर गेल्या 24 तासांत 20,044 प्रकरणांची नोंद झाल्यानंतर एकूण प्रकरणांची संख्या 4,37,30,071 वर पोहोचलीय.

Corona Case In India
तेलंगणात भाजप खासदाराच्या गाडीवर हल्ला; समर्थक-ग्रामस्थांमध्ये तुफान हाणामारी

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी 18,301 कोरोनाचे रुग्ण बरे झाले, त्यानंतर देशातील बरे झालेल्यांची संख्या 4,30,63,651 झाली आहे. भारतातील दैनंदिन सकारात्मकता दर 4.80 टक्के आहे.

Corona Case In India
मुसळधार पावसापासून महाराष्ट्र, गुजरातला दिलासा; 'या' 5 राज्यांत पुढील 3 दिवसांत मोठा पाऊस

महाराष्ट्रात 16 हजार कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण, 10 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात काल 2371 रुग्ण आणि 10 मृत्यू यांची नोंद झाली तर 2914 जण बरे झाले. राज्यात 16000 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या 80 लाख 14 हजार 823 कोरोना रुग्णांपैकी 78 लाख 50 हजार 808 बरे झाले. राज्यात कोरोनामुळे 1 लाख 48 हजार 015 जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या 8 कोटी 25 लाख 59 हजार 392 कोरोना चाचण्यांपैकी 80 लाख 14 हजार 823 पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.84 टक्के, पॉझिटिव्हिटी रेट 9.71 टक्के, रिकव्हरी रेट 97.95 टक्के आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()