रुग्णसंख्या कमी होत असताना WHO चा भारताला इशारा

soumya swaminathan
soumya swaminathan
Updated on

सोमवारी भारतामध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळाली. तब्बल 26 दिवसानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णवाढ तीन लाखांच्या खाली आहे. पण मृतांच्या संख्या मात्र सातत्यानं चार हजारांच्या पुढेच आहे. ग्रामिण भागातील कोरोना चाचणी कपात झाल्यामुळे रुग्णसंख्या कपात झाल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. रुग्णसंख्या कपात झाली म्हणजे, कोरोना महामारी आटोक्यात आली असं होत नाही. कोरोनाचा B.1.617 हा व्हेरियंट आपला प्रभाव वाढवत आहे, असे तज्ज्ञांमी म्हटलं आहे. (corona cases decline but who said situation may become serious again)

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ सौम्‍या स्वामीनाथन यांनी द हिंदू या वर्तमानपत्राशी बोलताना भारतीयांना महत्वाचा सल्ला दिला आहे. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, 'भारतातील काही ठिकाणी कोरोना अद्याप आपल्य सर्वोच्च पातळीवर पोहचलेला नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र, भविष्यात भारतामध्ये कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव आणखी वेगानं होऊ शकतो. भारतातील कोरोना परिस्थिती भविष्यात गंभीर होऊ शकते. देशातील कोरोना चाचण्या कमी झाल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही कमी दिसतेय. '

soumya swaminathan
भारतातील कोरोना स्थिती चिंताजनक - WHO प्रमुख

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येनं चार लाखांचा टप्पा पार केला होता. 26 दिवसानंतर पहिल्यांदाच हा आकडा तीन लाखांच्या खाली आला आहे. covid19india.org द्वारा जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी भारतात 2.81 लाख नवीन रुग्ण आढळले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()