India Coronavirus Cases: सावधान! कोरोनाचा धोका वाढतोय; देशात 24 तासांत आढळले तब्बल 10 हजारांहून अधिक रुग्ण

India Coronavirus Cases: देशात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत बसू लागली आहे.
India Coronavirus Cases
India Coronavirus Casesesakal
Updated on
Summary

भारतातील रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.67 टक्के आहे. आतापर्यंत देशात एकूण 4,42,50,649 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत बसू लागली आहे. संसर्गाच्या झपाट्यानं लोकांची चिंताही वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या बुधवारच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,542 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे कालच्या तुलनेत 38 टक्क्यांनी अधिक आहेत.

त्यामुळं सक्रिय रुग्णांची संख्या 63,562 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत या जीवघेण्या विषाणूमुळं 38 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

India Coronavirus Cases
Yogi Adityanath : अतिक-अशरफच्या हत्येनंतर CM योगींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हे कायद्याचं राज्य..

ताज्या आकडेवारीनुसार, भारतात संसर्गाचा दैनंदिन दर 4.39 टक्के आहे, तर साप्ताहिक दर 5.1 टक्के आहे. सध्या देशात 63,562 लोक कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेत आहेत, जे एकूण प्रकरणांपैकी 0.14 टक्के आहे.

India Coronavirus Cases
Karnataka Election : काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर; माजी मुख्यमंत्री शेट्टर हुबळी-धारवाडमधून लढणार

भारतातील रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.67 टक्के आहे. आतापर्यंत देशात एकूण 4,42,50,649 लोक संसर्गमुक्त झाले आहेत, तर कोविड-19 मुळं मृत्यूचं प्रमाण 1.18 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, भारतातील देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अँटी-कोविड-19 लसींचे 220,66,27,758 डोस देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.