देशावर कोरोनाचं संकट कायम! 24 तासांत आढळले 20,139 नवे रुग्ण, 38 जणांचा मृत्यू

देशात कोरोनाचे रुग्ण सातत्यानं वाढत आहेत.
Coronavirus in India
Coronavirus in Indiaesakal
Updated on
Summary

देशात कोरोनाचे रुग्ण सातत्यानं वाढत आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे (Coronavirus in India) रुग्ण सातत्यानं वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानं (Ministry of Health) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 20139 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, 16482 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत.

त्याचवेळी गेल्या 24 तासांत कोरोनामुळं 38 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाच्या एकूण सक्रिय प्रकरणांबद्दल बोलायचं झाल्यास, ही संख्या 136076 आहे तर सकारात्मकतेचा दर 5.10 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Coronavirus in India
सोनिया गांधींना पुन्हा ईडीचं समन्स; काँग्रेस करणार देशव्यापी आंदोलन

देशात आतापर्यंत एकूण 525557 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 136076 आहेत. बुधवारच्या तुलनेत आज देशात कोरोनाचे 3619 नवीन रुग्ण आढळले आहेत. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, केंद्र सरकारनं 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांसाठी कोरोनाचा बूस्टर डोस (corona vaccine booster dose) मोफत केला आहे. 15 जुलैपासून सर्व सरकारी केंद्रांवर कोरोनाचा बूस्टर डोस दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.