Omicron Variant : सध्या जगभरात कोरोना आणि त्याचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनने थैमान घातले आहेत, कोरोनाचा हा वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या संकटा दरम्यान कोरोना व्हायरस टेस्टिंगची (Corona Testing) गरज ही सध्या सर्वाधिक आहे. दरम्यान आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचण्या या संभाव्य कोविड-19 (Covid-19) संसर्ग शोधण्याचा सर्वात योग्य पर्याय मानला जातो, परंतु असे बरेच लोक लवकर रिझल्ट मिळवण्यासाठी रॅपिड अँटेजनन टेस्ट वर अवलंबून असतात.
ओमिक्रॉन व्हेरिएंटची ओळख पटवणाऱ्या रॅपिड टेस्ट ज्या 5 ते 30 मिनिटांत निकाल देतात त्या बऱ्याचदा घरी केल्या जाऊ शकत नाहीत ज्यामुळे सध्या जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले रुग्ण शोधणे कठीण बनले आहे. या दरम्यान कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्टच्या अध्यक्षा एमिली वोक (Emily Volk, president of the College of American Pathologists) यांच्या म्हणण्यानुसार, रॅपिड चाचण्या या ओमिक्रॉन, डेल्टा, किंवा अल्फा व्हेरिएंटमुळे झाला हे नसेल कळत नसले तरी देखील अशा टेस्ट कोरोनाची लागण झाली आहे का हे ठरवण्यासाठी उपयुक्त आहेत आणि त्यांचा वापर करत राहावा असे सांगतात.
प्राथमिक संशोधनानुसार, व्हायरसच्या इतर प्रकारांपेक्षा Omicron शोधणे अजून कठीण आहे. एका निवेदनात, युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने या आठवड्यात घोषित केले की जरी अनेक नवीन व्हेरिएंट्स एकत्र आले असले तरीही रॅपिड टेस्ट कोरोनाव्हायरस संसर्ग शोधण्याचे काम करत आहेत, मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंट शोधताना त्यांची संवेदनशीलता थोडी कमी होते.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत प्रथम आढळलेल्या नवीन व्हिरिएंटवर चाचण्या कशा प्रतिक्रिया देतात याविषयी सरकारी एजन्सीनीअभ्यास केला आहे. मात्र दरम्यानच्या काळात, घरगुती कोविड-19 चाचणीबाबत तज्ञांचे मत बदललेले नाही, जेव्हा फास्ट रिझल्ट्स हवे असतात तेव्हा लोकांनी हे वापरणे सुरू ठेवले पाहिजे.
अमेरिकेचे शीर्ष संसर्गजन्य रोग तज्ञ अँथनी फौसी (Anthony Fauci, US infectious diseases expert) यांच्या मते, ओमिक्रॉनचा शोध घेण्यासाठी घरी करण्यात येणाऱ्या कोविड-19 चाचण्यांची संवेदनशीलता सध्या खूप कमी असू शकते, तरीही एखाद्या व्यक्तीला कोविड-19 ची लागण झाली आहे की, नाही हे तपासण्यासाठी तो चांगला पर्याय आहे. त्यामुळे त्या चाचण्या महत्त्वाच्या आहेत.
एमिली वोक यांनी देखील सांगितले की, घरी कोविड-19 चाचण्या करण्याचे अनेक चांगले उपयोग आहेत. त्यामुळे लसीकरण केल्यास तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत एकत्र राहू शकता. त्यामुळे रॅपिड अँटेजन टेस्ट ज्यामुळे काही तासांत किंवा दिवसांत निकाल कळतो आणि एखाद्याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे की नाही याची माहिती मिळते. तसेच एखाद्या व्यक्तीला सर्दी किंवा घसा दुखत असल्यास, या चाचण्या विश्वासार्ह आहेत, मात्र यासाठी संदर्भ महत्त्वाचा आहे असेही त्या म्हणाल्या.
तसेच तुम्ही गर्दीच्या ठिकाणी गेलात आणि त्यानंतर तुम्हाला लक्षणे जाणवत असल्याने तुम्ही रॅपिड टेस्ट केली आणि निगेटिव्ह आली तर त्यावर जास्त विश्वास ठेऊ नका असे देखील त्यांनी सांगीतले आहे. यानंतर नेहमीप्रमाणे, RT-PCR टेस्ट करणे चांगले राहील, ज्या अधिक अचूक आणि हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. तसेच कोविड-19 आढळल्यास, रुग्णाचा नमुना कोरोना व्हायरसचे व्हेरिएंट शोधण्यासाठी योग्य प्रयोगशाळेत पाठविला जाऊ शकतो, असेही त्यांनी सुचवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.