भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. देशात 24 तासांत कोरोना व्हायरसचे तब्बल 423 रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात कोरोनाच्या 3,420 अॅक्टिव्ह केसेस आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या ही केरळमध्ये असून, येथे एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे.
ख्रिसमसच्या आधी जेएन.1 कोरोना व्हेरियंटबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना, कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे संपूर्ण देशाची चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अलीकडेच जेएन.1 ला बीए.2.86 पेक्षा वेगळा आणि व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हटले आहे.
शुक्रवारी देशभरात 328 नवे कोविड रुग्ण आढळले आहेत. देशात नवी दिल्ली, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पुद्दुचेरी, पंजाब, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये नवे रुग्ण आढळले आहेत. केरळला सर्वाधिक फटका बसला असून सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजारांच्या पुढे गेली आहे.
वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना कोरोना चाचण्या वाढविण्यास आणि कोरोनाशी संबंधित कोणत्याही नवीन घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
केरळमध्ये जेएन-1 व्हेरियंट पहिल्यांदा या महिन्याच्या सुरुवातीला एका 79 वर्षीय महिलेमध्ये आढळला होता. तेव्हापासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. केरळमध्ये 21 डिसेंबर 2023 पर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 2,041 असून 292 नवे रुग्ण आढळले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.