Corona : घबराट नको, पण नियम पाळणे गरजेचे

दिल्ली, मुंबईत वेगाने होणारी कोरोनाची वाढ चिंताजनक आहे.
corona rules
corona rulessakal media
Updated on

नवी दिल्ली : घशात खवखवणे या वरवर सामान्य वाटणाऱ्या प्राथमिक लक्षणाने आपला विषारी विळखा घालणारा ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट (Omicron in Corona's New Variant) यापूर्वीच्या डेल्टा इतका गंभीर नाही असे सांगितले जात आहे. पण तो गंभीर का नाही, याचे अंतिम निष्कर्ष समोर आलेले नाहीत. ओमिक्रॉनबाबत घबराट उडण्याचे कारण नाही. मात्र कोणत्याही परिस्थितीत कोरोना आरोग्य नियमांचे प्रत्येकाने कटाक्षाने पालन करणे अत्यावश्यक आहे, असा सावधानतेचा इशारा वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे. (Corona Marathi News)

सर गंगाराम रुग्णालयाचे संचालक, डॉ. अंबरीष सात्विक यांनी सांगितले, की कोरोनाच्या कोणत्याही व्हेरियंटबाबत, तो गंभीर नाही, असे म्हणताच येणार नाही. त्यामुळे कटाक्षाने व शक्यतो एन ९५ मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, विनाकारण गर्दी न करणे हे नियम प्रत्येकाने पाळले पाहिजेत. ओमिक्रॉनबाबत सध्या जी माहिती उपलब्ध आहे, त्यानुसार तो डेल्टाइतका गंभीर नाही. जगातच लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने, परिणामी जास्तीत जास्त लोकांची प्रतिकारक्षमता वाढल्याने त्याचे गांभीर्य कमी जाणवते हे सांगणे आज कठीण आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये ओमिक्रॉन रुग्णसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, ते साऱ्या देशानेच काळजी करण्यासारखे आहे.

corona rules
आधी 'त्या' बोलेरो गाड्यांची थकबाकी भरा; सावंतांचा नितेश राणेंना टोला

डॉ. सात्विक म्हणाले, की डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनचा संसर्ग फुफ्फुसांमध्ये तुलनेने कमी आहे. या नव्या व्हेरीयंटची लक्षणेही वेगळी आहेत. घशात खवखवणे, सर्दी, शिंका येणे, हलका ताप ही लक्षणे आहेत. ओमिक्रॉन शेकडो पटींनी जास्त संक्रामक आहे. देशाची लोकसंख्या पाहता याचा उद्रेक न होण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. बेफिकीर राहिलो तर दुसऱ्यापर्यंत विषाणूचे संक्रमण करु आणि त्यामुळे जर प्राणहानी झाली तर त्याची जबाबदारी कोणावर? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.

वेळीच रोखायला हवे

‘एम्स’चे प्राध्यापक डॉ. संजय राय यांच्या मते, जेव्हा ओमिक्रॉन अतिसंवेदनशील व दाट लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याची अवस्था येईल त्याच्या आधीच त्याला रोखणे आवश्यक आहे. कोणताही विषाणू तीव्र उन्हाळा वा थंडी अशा वातावरणात जास्त पसरू शकत नाही. मात्र या काळात माणसाची प्रतिकारक्षमता कमी होते आणि याच अवस्थेत हल्ला करण्याचा विषाणूचा इतिहास आहे. हे पाहता, प्रत्येकानेच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.