मोठा दिलासा! तिसरी लाट शक्य, पण प्राणघातक नसेल - CSIR

कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला आहे परंतु लसीकरणामुळे देशातील नागरिकांची सुरक्षितता वाढली आहे
corona
coronasakal media
Updated on

नवी दिल्ली : कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला आहे. परंतु लसीकरणामुळे देशातील नागरिकांची सुरक्षितता वाढली आहे. त्यामुळे त्याचा फार प्रभाव पडणार नाही. कोरोनाची तिसरी लाटही शक्य आहे. मात्र ही लाट आली, तरी ती प्राणघातक नसेल, असा दिलासादायक दावा दिल्लीतील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी केला आहे.

corona
नवाब मलिकांवर कायदेशीर कारवाई करणार: समीर वानखेडे

केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘देशातील शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण होणे ही देशासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. खासगी क्षेत्राच्या सहकार्याने आपल्या शास्त्रज्ञांनी एक वर्षात आपण लस विकसित केली आहे. आज दोनच नव्हे; तर आणखी लस आपल्याकडे उपलब्ध आहे. अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. म्हणून आजचा दिवस गौरवशाली आहे.

लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होतो आहे. त्यामुळे बुस्टर डोसची चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावर डॉ. मांडे यांनी सांगितले, की बुस्टर घ्यावा की नको, याबद्दल चर्चा जगभरात सुरू आहे. अनेक देशांत आढळून आले आहे, की लसीचे दोन डोस घेतल्यानंतर काही महिन्यांनी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आहे. पण आपण केवळ ॲन्टीबॉडीचा विचार करतो. मात्र, त्या व्यतिरिक्त टी सेल इम्युनिटही असते. त्यावरही संशोधन सुरू आहे. त्यामुळे इम्युनिटी कमी होते, असा दावा करता येत नाही तरीही दोन डोस घेतल्यानंतर सहा, आठ किंवा वर्षभरानंतर तिसरा डोस दिला, तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्यापूर्वी देशातील सर्व लोकसंख्येचे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यानंतर बुस्टर डोसचा विचार करू.

corona
100 कोटी डोस : थरुरांकडून सरकारचं कौतुक, काँग्रेसनं सुनावलं

कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये चढउतार दिसून आहेत. त्यात लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पाही भारताने ओलांडला आहे. आता तिसऱ्या लाटेची शक्यता किती आहे. या प्रश्‍नावर बोलताना मांडे यांनी तिसरी लाट येण्याची शक्य असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘तिसरी लाट येण्याची शक्तता खूप आहे. पण लसीकरणामुळे एक फायदा असा झाला आहे, की तिसरी लाट आली, तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण नगण्य असेल आणि मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्याही खूप कम असेल. लसीकरणामुळे ही लाट प्राणघातक नसेल. सर्दी, पडसे अशा रुपात ही लाट असेल. ब्रिटनमध्ये लाट आलेली आहे. तिथे मरणाऱ्या रुग्णांचे प्रमाण खूप कमी आहे. कारण तिथेही बऱ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण झाले आहे.’’

नवा म्युटंट आढळला

इन्साकॉग या कोरोनाची जनुकीय क्रमवारी तपासून नव्या बदलांचा शोध घेणाऱ्या प्रयोगशाळा संघास डेल्टा प्रकारातील नवा K४१७ N हा बदललेला विषाणू (म्युटंट) आढळला आहे. याबाबत डॉ. शेखर मांडे यांनी सांगितले, की नवा म्युटंट सापडला असला, तरी त्याची तीव्रता किती आहे, हे सांगता येणार नाही. पण इथेही लसीकरणाचा फायदा होणार आहे. लसीकरणामुळे नागरिकांची प्रतिकार क्षमता वाढली असल्याने संसर्ग झाला, तरी हा म्युटंटही फार घातक ठरणार नाही. त्यासाठी लसीकरण फार आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.