Corona Outbreak : कोरोनाला हलक्यात घेऊ नका! देशात 24 तासांत 1300 टक्के वाढ

Corona outbreak in india corona cases increases to 1300 percent in 24 hours
Corona outbreak in india corona cases increases to 1300 percent in 24 hours
Updated on

सध्या जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीचा धोका वाढला आहे.सगळीकडे चिंता वाढली असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात मागच्या २४ तासांत कोरोनाचे २,५८२ नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती दिली आहे. तर २२२ लोक बरे झाले आहेत.

मागच्या २४ तासात तब्बल १३०० टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. यापूर्वी १ जानेवारी रोजी १७३ रुग्ण सपडले होते तर मागील २४ तासात १,५१,१८६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

रिकव्हरी रेट किती आहे?

देशात मागील २४ तासांत ४५,७६९ वॅक्सीनचे डोस देण्यात आले आहेत, यादरम्यान सध्या रिकव्हरी रेट ८९.८ टक्के आहे. तसेच दररोजचा पॉझिटीव्हिटी रेट ०.०९ टक्के तर साप्ताहिक पॉझिटीव्हिटी रेट हा ०.१३ इतका आहे.

दरम्यान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ९१.१२ कोटी कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४,४१,४५,६६७ झाली आहे.

हेही वाचा - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

Corona outbreak in india corona cases increases to 1300 percent in 24 hours
Omicron XBB: भारतात वेगाने पसरतोय कोरोनाचा 'हा' व्हेरियंट, जाणून घ्या किती धोकादायक?

जगभर कोरोनाचे थैमान

सध्या चीनसह अनेक देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमिवर भारतात देखील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू शकते हे पाहाता शासकिय यंत्रणा अलर्टवर आहेत. चीनमध्ये कोरोनामुळे वाईट स्थिती पाहायला मिळत आहे. चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या ओमिक्रॉन सब-व्हेरिएंट BF.7 या ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटने भारतात देखील एंट्री केली आहे.

यादरम्यान केंद्रिय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांनी उच्चस्तरिय बैठक घेत ओमिक्रॉनच्या नव्या सब-व्हेरिएंटबाबत बैठक घेतली होती.

Corona outbreak in india corona cases increases to 1300 percent in 24 hours
Sushma Andhare : उर्फी प्रकरणात अंधारेंची उडी; कंगना, केतकी अन् अमृता फडणवीसांचे नाव घेत म्हणाल्या…

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.