नवी दिल्ली : कोरोनाचा (coronavirus) उच्चांक गाठल्यानंतर रुग्णांची संख्या कमी होऊ लागली (number of patients will decrease) आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांनी शनिवारी सांगितले की, काल दिल्लीत कोरोनाचे रुग्ण आदल्या दिवसाच्या तुलनेत साडेचार हजारांनी कमी होते. दिल्लीत कोरोनाची प्रकरणे शिगेला पोहोचली आहेत. मात्र, कालपासून या प्रकरणात घट झाली आहे. (Corona peak has arrived in Delhi)
आज दिल्लीत (delhi) कोविडच्या प्रकरणांमध्ये ४,००० ने घट होण्याची अपेक्षा आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांत रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढलेले नाही. काही दिवसांत ही प्रकरणे आणखी कमी होणार असल्याचे संकेत आहेत. रुग्णालयातील ८५ टक्के खाटा रिक्त आहेत. ते म्हणाले की रुग्णांचा उच्चांक आला आहे. घट केव्हा सुरू होते ते पाहणे बाकी आहे. रुग्ण आढळण्याचा वेग कमी झाला आहे, असेही सत्येंद्र जैन (Satyendra Jain) म्हणाले.
राजधानीत (delhi) कोरोनाच्या (coronavirus) सध्याच्या लाटेत प्राण गमावलेल्या रुग्णांपैकी ७५ टक्के रुग्ण हे लसीकरण न केलेले होते. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ९ ते १२ जानेवारीपर्यंत संसर्गामुळे मृत्यू झालेल्या ९७ लोकांपैकी ७० जणांना लसीकरण करण्यात आले नव्हते. १९ जणांना लसीचा पहिला डोस मिळाला होता. त्याचवेळी आठ जणांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले होते. त्याच्याशिवाय सात अल्पवयीन होते, असे सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांनी शुक्रवारी सांगितले होते.
कोरोनामुळे (coronavirus) ज्या रुग्णांना जीव गमवावा लागला त्यापैकी ७५ टक्के रुग्ण हे असे आहेत ज्यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. ९० टक्के रुग्णांना कर्करोग आणि किडणीशी संबंधित गंभीर आजार होते. अगदी १८ वर्षांखालील सात रुग्णांनाही पूर्वीपासून आजार होता, असेही जैन म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.