कोरोनाची कॉलरट्यून होणार बंद! सरकार करतंय विचार

Corona Restrictions Message will be closed
Corona Restrictions Message will be closedCorona Restrictions Message will be closed
Updated on

नवी दिल्ली : देशात कोरोना येऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. यामुळेच कोरोना संबंधित निर्बंधांचे पालन करण्यासाठी लोकांना फोन करण्याआधी जागरूकता संदेश (Corona Restrictions Message) ही ओळख बनली आहे. आता कॉल करण्यापूर्वी अशा प्रकारचे संदेश किंवा खबरदारीच्या उपायांशी संबंधित सूचना बंद केली जाऊ शकते. सरकार (government) आता कॉल करण्यापूर्वी कोरोना संदेश काढून टाकण्याचा विचार करीत असल्याचे सूत्राने सांगितले आहे. (Corona Restrictions Message will be closed)

दूरसंचार विभागाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून प्री-कॉल घोषणा आणि कॉलर ट्यून काढून टाकण्याची विनंती केली आहे. त्यात सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया तसेच मोबाईल ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांचा उल्लेख केला आहे. यामुळेच आरोग्य मंत्रालय आता (government) देशातील साथीच्या परिस्थितीत सुधारणा लक्षात घेऊन ऑडिओ क्लिप काढून टाकण्याचा विचार करीत आहे, असे सूत्राने सांगितले आहे.

Corona Restrictions Message will be closed
नील, किरीट सोमय्या आणि नीलेश राणेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनंतर दूरसंचार सेवा कंपन्यांना कोरोना संबंधित घोषणा आणि कॉल करण्यापूर्वी कॉलर ट्यून लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याद्वारे नागरिकांना साथीच्या आजारादरम्यान घ्यायची खबरदारी आणि लसीकरणाविषयी माहिती देण्यात येत आहे. या संदेशांनी (Phone Call) उद्देश पूर्ण केला आहे. आता ते बंद करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, साथीच्याविरुद्ध सुरक्षा उपायांबद्दल जनजागृती करण्यासाठी इतर उपाययोजना सुरू ठेवल्या जातील.

महत्त्वाच्या कॉलला विलंब होण्याचा धोका

जवळपास २१ महिने या घोषणांनी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने काम केले आहे. आता त्यांची गरज (Corona Restrictions Message) नाही. नेटवर्कवरील या संदेशांमुळे आणीबाणीच्या काळात महत्त्वाचे कॉल होल्डिंग आणि विलंब होण्याचा धोका राहतो. मौल्यवान बँडविड्थ संसाधने वापरण्याचा धोका निर्माण होतो. तसेच यामुळे कॉल जुळायला विलंब होतो. आणीबाणीच्या वेळी फोनला उशीर होतो. रिंग बॅक टोन अक्षम करण्याची विनंती देखील करण्यात आली आहे, असे दूरसंचार विभागाने पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.