कोरोनाव्हायरसच्या नवीन JN.1 प्रकाराचा धोका सध्या वेगाने वाढतो आहे. यादरम्यान या नवीन व्हेरिंयंटबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांन लोकांनी सध्या घाबरण्याची गरज नाही. नवीन व्हेरियंट हा 'व्हेरियंट ऑफ कंसर्न' नसून 'व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट' असल्याचे त्यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. मात्र यानंतरही कोरोनाच्या या नव्या प्रकाराबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्वामीनाथन यांनी सांगितलं की, आपल्याला सावध राहण्याची गरज आहे, परंतु आपल्याला काळजी करण्याचीही गरज नाही, कारण आपल्याकडे JN.1 व्हेरियंट धोकादायक असल्याचे आढळून येईल असा डेटा नाही. त्यामुळे जास्त न्यूमोनिया होईल की मृत्यू होईल हे अद्याप आम्हाला माहीत नाही. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, मला वाटते की आत्ता आपल्याला सामान्य उपाय करावे लागतील, जे आपण करत आलो आहोत. आपल्याला Omicron बद्दल माहिती आहे आणि हा सब व्हेरियंट देखील त्याचाच एक भाग आहे.
आत्तापर्यंत, JN.1 सब व्हेरियंटची 26 प्रकरणे भारतात नोंदवली गेली आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. 26 प्रकरणांपैकी गोव्यात 19, राजस्थानमध्ये 4 आणि केरळ, दिल्ली, महाराष्ट्रात प्रत्येकी एक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
गोव्यात आढळलेल्या JN.1 सब व्हेरियंटची सर्व 19 प्रकरणे निष्क्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णांकडून गोळा केलेल्या नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग केली असता, हा व्हेरियंट आढळून आला आहे.
गोव्यातील एपिडेमियोलॉजिस्ट डॉ प्रशांत सूर्यवंशी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, JN.1 व्हेरियंट असलेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे होती आणि ते आता बरे झाले आहेत. कुठेतरी ही दिलासादायक बातमी आहे.
बुधवारी राजस्थानमधील जैसलमेरमध्ये JN.1 सब-व्हेरियंटशी संबंधित दोन कोविड प्रकरणे नोंदवली गेली. गुरुवारी जयपूरमध्ये आणखी दोन प्रकरणे समोर आली. अशा प्रकारे हा प्रकार राजस्थानमध्ये दाखल झाला आहे.
भारतात कोविडचे 594 नवीन रुग्ण आढळले आहेत. अशा प्रकारे, देशातील कोरोना प्रकरणांची सक्रिय संख्या 2669 वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने JN.1 ला 'व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून क्लासिफाइड केले आहे. हा प्रकार BA.2.86 पासून उद्भवला आहे, परंतु त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे. सध्या या नवीन प्रकारातून कमी धोका असल्याचे दिसत आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, इंग्लंड आणि स्कॉटलंडमधील 24 पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. लंडन मध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, येथे JN.1 व्हेरियंट वेगाने पसरत आहे.
ब्रिटनची 'हेल्थ सिक्युरिटी एजन्सी' आणि 'ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्स'च्या जॉइंट रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोक कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरत आहेत.
या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे थंड तापमान, लहान असलेले दिवस आणि हिवाळ्याच्या दिवसात लोक एकत्र येणे यामुळे कोरोना सहज पसरत आहे.
इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये कोरोना प्रसाराचा दर 4.2 टक्के आहे, तर लंडनमध्ये तो 6.1 टक्के आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.