भारतात गेल्या 24 तासांत 16,135 नवीन कोरोना रुग्ण, 24 जणांचा मृत्यू

Coronavirus in India
Coronavirus in Indiaesakal
Updated on
Summary

देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये चढ-उतार सुरूच आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या (Coronavirus in India) प्रकरणांमध्ये चढ-उतार सुरूच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सोमवारी सांगितलं की, गेल्या 24 तासांत देशात 16,135 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 24 जणांचा मृत्यू झालाय. रविवारच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झालीय.

रविवारी, 16 हजार 103 नवीन रुग्ण समोर आले. आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) म्हणण्यानुसार, दैनंदिन सकारात्मकता दर 4.85 टक्के असून सक्रिय प्रकरणांची संख्या 1,13,864 झालीय. रविवारी सलग दोन दिवस 17 हजारांहून अधिक रुग्ण आढळल्यानंतर नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. रविवारी 16,135 रुग्ण आढळण्यापूर्वी शनिवारी 17,092, शुक्रवारी 17,070 आणि 30 जून रोजी 14,506 रुग्णांची नोंद झाली.

Coronavirus in India
Petrol-Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दिलासा; देशात आजचे दर काय?

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत 13958 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 3918 (coronavirus in maharashtra), केरळमध्ये 3611 आणि तामिळनाडूमधील 1487 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये एकूण 4,28,79,477 लोकांनी कोरोनावर मात केलीय. आरोग्य मंत्रालयानं सोमवारी सांगितलं की, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 2153 नं वाढली आहे. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 1293 तर तामिळनाडूमध्ये 1185 प्रकरणं वाढली आहेत. इतर राज्यांमध्ये ओडिशात सक्रिय प्रकरणांची संख्या 346 पेक्षा कमी आहे. महाराष्ट्रात 962 आणि दिल्लीत 142 सक्रिय रुग्णांची घट झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.